आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चितेवरील भाऊरायाला बहिणीने बांधली राखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - कुटुंबातील लोक दुचाकी खरेदीसाठी पैसे देत नसल्याने बारावीत शिकणाऱ्या भावाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे भाऊ का आला नाही, हे पाहण्यासाठी गेलेल्या विवाहित बहिणीला त्याच्या अंत्यसंस्काराला जाण्याची वेळ आली. चितेवर भावाच्या हाताला तिने राखी बांधल्याने अंत्यसंंस्कारास आलेल्या नातेवाइकांचे डोळे पाणावले. गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे घडलेल्या या प्रसंगाने ग्रामस्थ हळहळले.

मादळमोही येथील अंकुश डिंगरे यांच्याकडे त्यांचा भाचा गणेश ज्ञानेश्वर नाईक हा कुटुंबासह राहत होता. गणेश हा गावातील नवीन स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिक्षण घेत होता. कुटुंबातील लोकांनी दुचाकीसाठी पैसे द्यावेत, अशी मागणी तो करत होता.मात्र, दुचाकीसाठी पैसे न मिळाल्याने नाराज झालेला गणेश गुरुवारी रात्री मित्रांना भेटून मोहित्याचीवाडी या त्याच्या शेतात गेला. रात्र झाली तरी तो घरी न आल्याने कुटुंबातील लोकांनी शोधाशोध केली, परंतु तो सापडला नाही. शेवटी त्यांच्या शेतातील सालगडी घरी परतल्यानंतर शेतात गणेश दिसल्याचे सालगड्याने सांगितले. गुरुवारी रात्रभर फिरूनही कुटुंबातील लोकांना त्याचा पत्ता लागला नाही. शेवटी शुक्रवारी गणेशचा मृतदेह शेतात आढळला होता.

लहानपणी आजीने वाचवले होते
घनसावंगी (जि. जालना)येथे गणेशचे कुटुंब राहत होते. तो अडीच वर्षांचा असताना त्याच्या वस्तीवर दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांच्या मारहाणीत वडील ज्ञानेश्वर व आजोबा सोनाजीराव यांचा मृत्यू झाला होता. आजी मंदाबाई यांनी त्याला लपवून ठेवल्याने गणेश वाचला होता. या घटनेनंतर गणेश हा कुटुंबासह मादळमोहीत मामाकडे राहत होता.
बातम्या आणखी आहेत...