आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - प्रेम प्रकरणातून प्रियकराने गळफास घेेतला तर प्रेयसीने कीटकनाशक घेतले. यात प्रियकराचा मत्यू झाला तर प्रेयसी मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील किन्हीजवळील शेलारवाडीत गुरुवारी दुपारी घडली.

धामणगाव येथील तरुण जितेंद्र पांडुरंग चौधरीचे कारखेल येथील वैशाली नामदेव राठोड हिच्याबरोबर प्रेमसंबंध होते. प्रेम प्रकरणातून गुरुवारी दुपारी किन्हीजवळील शेलारवाडी परिसरात हे युगुल दुचाकीने आले होते. डोंगराळ उताराला लिंबाच्या झाडाखाली सुरुवातीला तरुणाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याच वेळी प्रेयसीने कीटकनाशक प्राशन केले. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. प्रेयसीला सुरुवातीला आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.