आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅपवरून आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणारा तरुण अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र व मजकूर व्हॉट्सअॅपवरून ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या सचिन बिडवे (रा. मोतीमहाल, माळीवेस, बीड) या तरुणावर शुक्रवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून मोबाइल जप्त केला आहे.

सचिन बिडवे याने गुरुवारी रात्री नऊ वाजता व्हॉट्सअपॅवरून मैत्री या ग्रुपवर धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र व मजकूर पोस्ट केला होता. कारंजा येथील नवशाद अली शेख सज्जाद अली यांनी दिलेल्या तक्रारीवरून बिडवे याच्यावर धार्मिक भावना दुखावणे व आयटी अॅक्टप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला अटक केली असून त्याच्याकडील मोबाइल जप्त केला आहे.

गुरुवारी रात्री पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे व पोलिस निरीक्षक मारुती पंडित यांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांची एक बैठक घेत शांतता राखण्याचे आवाहन केले. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.