आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपमान झोंबला, जिवावर बेतला! किनवट पोलिस ठाण्यात युवकाने जाळून घेतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - चोरीच्या गुन्ह्यातील संशयित संजय ऊर्फ संदीप पिराजी धोत्रे (२५) या आरोपीने मंगळवारी दुपारी दीड वाजता किनवट पोलिस ठाण्याच्या आवारातच स्वत:वर राॅकेल ओतून जाळून घेतले. यात तो ९० टक्के भाजला. त्याला आदिलाबादला हलवले असून प्रकृती गंभीर आहे.

किनवटमधील भगतसिंगनगरात ३१ मे च्या रात्री मोहंमद लायक मो. युसूफ या व्यापा-याच्या घरी ७० हजार रुपयांची चोरी झाली. मोबाइल फोन, सोन्याचे गंठण, झुमके असा ऐवज लंपास झाला. चोरीप्रकरणी मोहंमद लायक यांनी गंगानगरात राहणा-या संजय धोत्रे याने चोरी केल्याची तक्रार दिली.

चोरीप्रकरणी पोलिसांचे पथक गंगानगरात आरोपीच्या शोधात गेले असताना संजय धोत्रेच्या घरात शंकर रँपनवाडसह पाच पुरुष व पाच महिलांनी पोलिसांना त्याचा शोध घेण्यास मनाई केली. त्याला शोधू नये म्हणून पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांना धमकावण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद भारती यांनी याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात पाच महिला व पाच पुरुषांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला. यातील आरोपींना मंगळवारी सकाळी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात संजयची आई व बहीण होती.

घरातील लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच संजय धोत्रे हा दुपारी ठाण्यात गेला. चोरीच्या गुन्ह्यात या लोकांचा काय संबंध यावरून त्याने हुज्जत घातली. घरातील महिलांना पोलिसांनी पकडल्यामुळे त्याला अपमानास्पद वाटल्याने त्याने ठाण्यातच अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले. जळालेल्या अवस्थेतच तो पोलिस ठाण्याच्या आवारात सैरावैरा धावत सुटला. तिथे हजर असलेल्या काही पोलिस कर्मचा-यांनी विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ९० टक्के भाजला गेला. दरम्यान, पोलिसांनी हल्लाप्रकरणी १० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यात संजय नव्हता, अशी माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कांबळे यांनी दिली.
पुढे वाचा, किनवट पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी संजय धोत्रे या युवकाने जाळून घेतले. त्याच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी रोखले