आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या तेराव्याच्या दिवशीच मुलाचा अपघाती मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन (जालना)- वडिलांच्या तेराव्याला मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाडी खुर्द येथील ऊसतोड मजुरी करणाऱ्या कांबळे कुटूंबावर त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

 

 

भोकरदन शहरालगत असलेल्या दोन किमी अंतरावर मनापूर फाट्याजवळ आज दुपारी पावणेचारच्या सुमारास  भरधाव वेगात असलेल्या दोन मोटारसायकलीमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात संजय दयानंद कांबळे (वय 35, रा. नवलवाडी) यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. 

 

 

भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर जखमी झालेल्या एकनाथ पढंरीनाथ सुसर (वय 32, रा मलकापूर, ता भोकरदन) व सिध्दार्थ रायभान पारवे (वय 55, रा. वाडी) यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. संजयचे वडील दयानंद कांबळे यांचे दि. 7 नोव्हेबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या तेराव्याचा कार्यक्रम आज होता. 

बातम्या आणखी आहेत...