आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतीशच्या आत्महत्येप्रकरणी हिमायतनगर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - हिमायतनगर तालुक्यातील डोलारी येथील सतीश माधवराव कदम याच्या आत्महत्येप्रकरणी अखेर हिमायतनगर पोलिस ठाण्यात चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. बहिणीचे लग्न मोडल्याने सतीशने मंगळवारी सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती.

सिरपल्ली येथील पंजाबराव भुजंगराव जाधव याच्या मुलासोबत गेल्या वर्षी सतीशच्या बहिणीचे लग्न ठरले. १२ मे रोजी साखरपुडाही झाला. यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. पुढे पाणीटंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्न लवकर करून टाकू, या उद्देशाने मंगळवारी सतीशसह त्याचे वडील, काका व अन्य नातलग सिरपल्ली येथे गेले; परंतु तिथे सासरच्या मंडळींनी अवाजवी मागण्या करून लग्न मोडीत काढले. त्यामुळे हताश झालेल्या सतीशने आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली; परंतु नंतर रात्री उशिरा सिरपल्ली येथील रमेश भुजंगराव जाधव, पंजाबराव भुजंगराव जाधव, गोपी भुजंगराव जाधव, भुजंगराव जाधव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.