आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहटीच्या पुलावरून उडी मारून युवकाची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - परभणी-वसमत रस्त्यावरील राहटी येथील पुलावरून पूर्णा नदीत एका युवकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.सहा) रात्री उशिरा घडली. प्रकाश दासराव रसाळ (२६) असे त्या युवकाचे नाव आहे.

परभणीतील दत्तनगरातील प्रकाश दासराव रसाळ हा युवक मंगळवारी रात्री त्याच्या मोटारसायकलने(एम.एच.२२-बी ७२७७) राहटीच्या पुलापर्यंत एकटाच गेला. त्याने आपली मोटारसायकल बाजूला लावून पुलावरून नदीत उडी मारली. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी पुलावर दुचाकी आढळून आल्याने दुचाकीच्या क्रमांकावरून पूर्णा पोलिसांनी प्रकाशच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. दरम्यान, त्याला पाण्यात शोधण्याचे काम सुरूच होते. नांदगाव येथील कोळी समाजाच्या मासेमारी करणाऱ्या व्यक्तींनी नदीतून बुधवारी (दि.सात) दुपारी चारच्या सुमारास पाण्याच्या बाहेर काढला. प्रकाश रसाळचा मृतदेह बंधाऱ्याजवळ आढळून आला.