आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youths Collected 3 Lakh Rupee For Orphan Treatment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणसुकीचा झरा: अनाथाच्या उपचारासाठी तरुणाईने जमवले ३ लाख रुपये!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शामवर केईएममध्ये उपचार सुरू अाहेत. - Divya Marathi
शामवर केईएममध्ये उपचार सुरू अाहेत.
जालना - आधुनिकतेमुळे तरुणाईची समाजाशी नाळ तुटत चालल्याची ओरड होत असली तरी ती फारशी खरी नसून अडल्यानडल्यांच्या मदतीला आधी धावत होती, तशीच आजची तरुणाई धावून जाते, याची प्रचिती जालन्याच्या तरुणांनी स्वत:च्या कृतीतून दिली आहे. तरुणांच्या सामाजिक बांधिलकीमुळेच औरंगाबादेत काम करणा-या एका अनाथाच्या ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये गोळा झाले आणि त्या अनाथाचे प्राण वाचले.

औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्ये काम करणा-या श्याम नांदरे या अनाथ युवकाच्या ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी जालन्यातील ७० ते ८० युवकांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी शक्य होईल तेवढी मदत करून ३ लाखांपर्यंत वर्गणी गोळा केली. या निधीतून श्याम नांदरेवर मुंबईच्या केईएम रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

जालन्यातील अमर शेळके हे शिक्षणानिमित्त औरंगाबादेत राहतात. त्यांच्या खोलीशेजारी श्याम नांदरेही राहायचा. श्यामच्या आईवडिलांचे १५ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. श्याम अचानक आजारी पडल्यामुळे एमजीएम रुग्णालयात दाखल झाला. त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. शस्त्रक्रियेसाठी ५ लाखांपर्यंत खर्च येत असल्यामुळे एवढा खर्च कोण करणार, असा प्रश्न त्याला पडला. दरम्यान, शेळके यांना ते कळले. त्यांनी जालन्यातील मित्रांना श्यामच्या आजाराची कल्पना दिली. त्यानंतर या मित्रमंडळींनी श्यामच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे जमवण्याचा निश्चय केला. सर्वांनी शक्य तेवढी रक्कम तर दिलीच, शिवाय इतर मित्रांनाही मदतीसाठी प्रोत्साहित केले. सर्वांच्या पुढाकाराने ३ लाखांपर्यंत वर्गणी जमा झाली. आठ दिवसांपूर्वीच श्यामवर केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून जीव धोक्याबाहेर आहे. अमर शेळके, सुनील कदम, रवी सोनी, दीपक औरंगे, अक्षय कुलकर्णी, अनिल वाघमारे, रवी बर्डे यांच्यासह अन्य युवकांनी यासाठी पुढाकार घेतला.

डॉक्टरांनीही केली मदत
श्यामला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो अनाथ असल्याचे कळल्यावर तेथील डॉक्टरांनीही मदतीचा हात पुढे केला आणि श्यामला वैद्यकीय उपचारांच्या शुल्कातही सूट दिली.

पुढे वाचा, मैत्रचीही मांदियाळी