आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींची आजोळभूमी ते जन्मभूमी तरुणांची गडकोट मोहीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका !  
शिवरायांची शपथ, कधी हार मानू नका ॥  
वाईटाच्या संगतीत राहाल तर माती व्हाल !  
शिवरायांच्या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल ॥
असा संदेश देत वेरूळ येथील निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी, समाजरत्न व धर्मयोद्धा संघाचे संस्थापक श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व उपस्थितीमध्ये सर्वांगीण युवा प्रतिष्ठानप्रणीत धर्मयोद्धा संघाच्या महाराष्ट्रभरातील साडेसहाशेहून अधिक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आजोळभूमी वेरूळ ते जन्मभूमी शिवनेरी अशी गडकोट मोहीम रविवारी राबवली.  
 
या वेळी या तरुणांनी स्वामी शांतीगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वेरूळ येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीवर रविवारी सकाळी सहा वाजता स्वच्छता मोहीम राबवत व शहाजीराजेंच्या पुतळ्याचे पूजन करून शिवरायांच्या जन्मभूमीकडे प्रस्थान केले. दुपारनंतर शिवनेरी येथे शिवरायांचे जन्मस्थळ परिसर व बदाम टाका परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. ही मोहीम यशस्वितेकरिता विश्वस्त राजेंद्र पवार, गणपत म्हस्के, राजेंद्र चव्हाण, कवरेज पाटील, धर्मयोद्धा संघाचे अध्यक्ष ब्र. नागेश्वरानंद, उपाध्यक्ष कैलास कुऱ्हाडे, सचिव पंकज ठाकूर, सहसचिव शिवप्रसाद कथले, कोशाध्यक्ष भूषण विसपुते, सदस्य अनिल डोळस, सदस्य मुकुंद पिंगळे आदींनी प्रयत्न केले.
बातम्या आणखी आहेत...