आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथरीत जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- पाथरी तालुक्यातील सारोळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष कचरू लकडे (40) असे या प्राथमिक शिक्षकाचे नाव असून त्यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. चारही चिठ्ठ्यांतील मजकूर एकच असून त्यात मुख्याध्यापकपदाची जबाबदारी नको, अशा स्वरूपाचा आशय आहे.
पाथरी शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी असलेले संतोष लकडे हे यांची दोन महिन्यांपूर्वीच सारोळा खुर्द येथील प्राथमिक शाळेत बदली झाली होती. तेथील मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्याने त्याचा पदभार शशिकांत बदगे या शिक्षकाकडे होता. लकडे रुजू झाल्यानंतर ते सेवेत ज्येष्ठ असल्याने त्यांना हा पदभार घ्यावयास सांगण्यात आले. परंतु पदभार घेण्यास नकार देऊन ते काही दिवस रजेवर गेले होते. ते पदावर काम करण्यास इच्छुक नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यातूनच निराश झालेल्या लकडे यांनी गळफास घेतला.