आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभवरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वादावादी, मुख्यमंत्र्यापर्यंत तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यावरुन महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकारण तापायला लागले आहे. राज्य सरकारमधील एक काँग्रेसचे मंत्री बच्चन यांना महाराष्ट्र राज्याच्या ब्रॅड अंम्बेसिडरपदी नेमणूक करावी या मताचे आहे. तर, दुसरीकडे पक्षाने बच्चन यांच्या निवडीला रेड सिग्नल दिला आहे.
एकेकाळी गांधी परिवाराच्या जवळ असणारे व राजीवचे खास दोस्त असलेले अमिताभ सध्या गुजरातचे ब्रॅड अंम्बेसिडर आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बच्चन यांना एक पत्र लिहून राज्यातील विस्कळीत वाहतुकीला आळा घालण्यासाठी आपण सहकार्य करावे, असे म्हटले होते. त्यावर बच्चन यांनी सकारात्मक होकार दिला होता. मात्र काँग्रेस पक्षाला पाटील यांचा हा मुद्दा फारसा पटला नाही.
पक्षाचे आमदार आणि मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष चरनसिंह सापरा यांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली आहे.
याबाबत सापरा यांनी सांगितले की, अमिताभ सध्या गुजरातचे ब्रॅड अंम्बेसिडर आहेत. ज्या राज्यावर असा मुख्यमंत्री आहे ज्याच्या राज्यात दंगे झाले होते. याचबरोबर बच्चन परिवार समाजवादी पक्षाशी निगडीत आहे. अशा व्यक्तीला ब्रॅड अंम्बेसिडर तुम्ही कसे काय बनवू शकता.
सापरा यांनी पाटील यांच्याबाबत म्हटले आहे की, बच्चन यांना पत्र लिहण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची परवानगी घ्यायला हवी होती. तसेच बच्चनपेक्षा युवा नेत्यांचा अधिक प्रभाव पडेल. त्यामुळे आमिर खान, अजय देवगण, शाहरुख खान जास्त प्रभावी ठरतील.
शाहरूख सारखा मी सेल्समन नाही: अमिताभ