आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवराजचा कॅन्सरला बायबाय : मुंबईत लावले ठुमके, लवकरच मैदानात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- युवराजसिंगच्या रक्ताच्या नमुन्यावरुन आता स्पष्ट झाले आहे की तो आता पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाला आहे. त्यामुळे लढवय्या युवराजने कॅन्सरला बायबाय करण्यात यश मिळवले आहे. युवराज सिंग अनेक महिन्यानंतर आज सार्वजिनक कार्यक्रमात सहभागी झाला. दक्षिण मुंबईत झालेल्या एका म्युझिक लॉंन्चिक पार्टीत तो सामील झाला तसेच त्याने संगिताच्या तालावर ठुमके लगावले. त्यानंतर आपण कॅन्सरमुक्त झाले असल्याचे सांगितले.
युवराजने सांगितले की, आता माझ्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात स्पष्ट झाले आहे माझ्या शरीरातील कॅन्सर पूर्णपणे नष्ट झाला आहे. मी लवकरच नेट प्रॅक्टिस सुरु करणार आहे. युवराजने दैनिक भास्कर समुहाशी बोलताना सांगितले की, माझा ब्लड रिपोर्ट आला आहे. मी पूर्णपणे बरा झालो आहे. मला आशा आहे की, मी मैदानात व भारतीय संघात लवकरच परतेन.
सध्यातरी मला फिट वाटत आहे. बघूया मैदानात किती दिवसात उतरतो ते, असेही युवराज म्हटला.
युवराजबरोबर या पार्टीत इरफान पठाण, अभिनेता रितेश देशमुख आणि मिलिंद सोमन उपस्थित होते. पार्टीची होस्ट अनूष्का दांडेकर हिच्याबरोबर युवराज सिंगने 'बेटर देन योर एक्स' या म्यूझिक अलबमच्या रिलीज सोहळ्यात धमाल नृत्य केले. त्यानंतर त्याने लंडनमधील होऊ घातलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताकडून सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच चांगली मेहनत घेतल्याने भारताला चांगली पदके मिळतील अशी आशा व्यक्त केली.
कॅन्‍सरवर मात केलेला युवराज करतोय आणखी एका आव्‍हानाचा सामना