आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरात दीड लाख विद्यार्थ्यांची गळती!, आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षभरात पहिले ते आठव्या इयत्तेतील सुमारे १ लाख, ५५ हजार विद्यार्थ्यांची राज्यात गळती झाल्याची धक्कादायक माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून निष्पन्न झाली आहे. त्यावरून अजूनही राज्यात माेठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गळती हाेत असल्याचे उघडकीस अाले अाहे.
सन २०१४-१५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या १ लाख, ५ हजार शाळा हाेत्या आणि पटावरील विद्यार्थ्यांची संख्या १ कोटी, ६१ लाख, ७२,४२० होती. मात्र सन २०१५-१६ मध्ये ही विद्यार्थी संख्या घटून १ कोटी, ६० लाख, १६, ७५४ झाली आहे. सरकारी तसेच खासगी शाळांमध्ये केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवरून हे वास्तव समाेर अाले अाहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद विभागाच्या माहितीच्या आधारे आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांची गळती का झाली, याची कारणे मात्र या अहवालात नमूद करण्यात आलेली नाहीत. बोगस विद्यार्थी दाखवून पटसंख्या वाढवायची आणि सरकारचे अनुदान घ्यायचे असा प्रकार अनेक शाळांमध्ये होत असल्याचे चार वर्षांपूर्वी उघड झाले होते. यानंतर सरकारने कडक धोरण स्वीकारून पट पडताळणी सुरू केली होती. या पडताळणीचे आता परिणाम दिसून येत अाहेत. दरम्यान, सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या संख्येबाबत काही सांगण्यास शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.
गेल्या वर्षीपासून सरकारने शाळांना आपल्या विद्यार्थ्यांची माहिती सरल अर्जाद्वारे सरकारला सादर करण्याचे आदेश दिले होते. याचबरोबर सरकारच्या स्वत:च्या अहवालानुसार राज्यातील ८१ हजार मुले ही शाळाबाह्य असल्याचे दिसून आले होते. राज्यात असा प्रकारचा अहवाल प्रथमच तयार करण्यात आला होता. सर्व मुलांना शिक्षण मिळालेच पाहिजे, असा शिक्षण हक्क कायदा सहा वर्षांपूर्वी आल्याने गळती झालेल्या ८१ हजार विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याचे शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान आहे.
आठवीनंतरच्या वर्गात मात्र विद्यार्थी वाढले
पहिली ते आठवीत विद्यार्थी गळती होत असताना ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. २०१४-१५ मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या २४,४९७ होती आणि पटावरील विद्यार्थी होते ६१.८१ लाख. तर २०१५-१६ मध्ये ही संख्या २५ हजारांपर्यंत वाढली असून यामधील विद्यार्थ्यांची संख्या ६४.१४ लाख होती. यात काही कनिष्ठ महाविद्यालयेही नव्याने वाढली.
शाळातील विद्यार्थी घटले, सुविधा वाढल्या
विद्यार्थी शाळा सोडत असताना सुविधा असलेल्या शाळांच्या टक्केवारीत मात्र वाढ झाली हे विशेष. पिण्याचे पाणी, संरक्षक भिंती, मुलींकरिता शौचालये, संगणक, विद्युत जोडणीत वाढ झाल्याचे दिसते. सन २०१४-१५ मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध असणाऱ्या शाळांची टक्केवारी ९९.६, मुलींसाठी शौचालये असलेल्या शाळांची संख्या ९८.६ व संगणक असलेल्या शाळांची टक्केवारी ५४.३ टक्के होती.
बातम्या आणखी आहेत...