आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Crores Fraud, Actress Leena Paul With Lover Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा काेटींची फसवणूक; अभिनेत्री लीना पाॅलसह प्रियकरही अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमसोबत 'मद्रास कॅफे' चित्रपटात झळकलेली अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह इन पार्टनर शेखर ऊर्फ सुकेश यांना १० कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट गुंतवणूक कंपनी उघडून गुंतवणूकदारांना दहापट रक्कम देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. मात्र, गुंतवलेले पैसे परत घ्यायला गेले त्या वेळी लीना आणि शेखर त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले. या कंपनीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून १३७ विदेशी मनगटी घड्याळे आणि सात महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. मागच्या दीड वर्षात दोघांनी सुमारे १० कोटींचा घोटाळा केल्याचा पोलिसांना संशय आहे. लीनाचे आईवडील दुबईला राहतात. बॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी लीना २०११ मध्ये भारतात राहायला आली. दरम्यान, मॉडेलिंग करत असतानाच तिला मल्याळम चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. याचदरम्यान तिची शेखरशी भेट झाली आणि त्यानंतर दोघांनी वाममार्गाने संपत्ती जमवण्याचा व्यवसाय सुरू केला.

यापूर्वीही झाली होती अटक
दोघांनी यापूर्वी २०१३ मध्ये तामिळनाडूतील कॅनरा बँकेची १९ कोटींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांना दिल्लीतील एका फार्महाऊसमधून अटक करण्यात आली होती. दरम्यान, २०१३ मध्येच एका अन्य प्रकरणात शेखरने स्वत:ला आयएएस अधिकारी आणि लीना आपली पत्नी असल्याची बतावणी करून एका व्यक्तीकडून एका प्रकल्पासाठी ७६ लाख रुपये उकळले होते.

अन्य चौघेही अटकेत
दरम्यान, याप्रकरणी लीना आणि शेखर यांच्यासह अख्तर जयपुरी, नासीर जयपुरी, सलमान रिझवी आणि आदिल जयपुरी या चौघांनाही अटक केली आहे. सहाही जणांना ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून चौकशीत आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.