आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Lac Donate For Drought Area To Political Leader

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंत्री, आमदारांकडून 10 लाख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक मंत्री आणि आमदार आपले एक महिन्याचे वेतन देऊ करीत मुख्यमंत्री सहायता निधीत 10 लाख 21 हजार 300 रुपयांची भर घातली आहे. सरकारी अधिकारी, पोलिस विभागानेही मोठ्या प्रमाणावर मदत दिली असून एकूण रकमेचा आकडा अजून जाहीर झालेला नाही.
दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करून स्वत:चा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. त्यानंतर लगेचच मुंबईचे पालकमंत्री नसीम खान यांनीही पगार देऊ केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केल्यानंतर आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते 57 हजार, दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण 75 हजार, राज्यमंत्री गुलाबराव देवकर 56 हजार, गृहमंत्री आर. आर. पाटील 57 हजार, नसीम खान 57 हजार, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे 57 हजार 300, राज्यमंत्री सचिन अहिर यांनी 51 हजार रुपये म्हणजेच आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर 75 हजार, गणपतराव देशमुख 50 हजार तसेच सदाशिवराव सपकाळ 25 हजार, साहेबराव पाटील 25 हजार, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी 20 हजार, सुहेल लोखंडवाला 25 हजार, अ‍ॅड. एम. व्ही. टेमुद्रे-पाटील 30 हजार व बीड जिल्ह्यातील माजी आमदार भीमराव धोंडे यांनी 1 लाख पाच हजार रुपये दिले आहेत.

18 कोटींपर्यंत निधी
मुंबई पोलिसांकडून 15 कोटी रुपये निधीत जमा होणार आहेत. त्यांची ही देणगी ऐच्छिक असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सरकारी अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचाºयांनीही एक दिवसाचा पगार देऊ केला आहे. यातून मुख्यमंत्री निधीत साधारण 15 ते 18 कोटी रुपये जमा होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

खडसे, तावडेंकडून प्रत्येकी 10 हजार
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, उपसभापती वसंत डावखरे व विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपाध्यक्ष वसंत पुरके, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, खासदार एकनाथ गायकवाड व दत्ता मेघे, नगरसेविका सहाना रिझवान खान यांनी एक महिन्याचा पगार देण्याऐवजी प्रत्येकी 10 हजार रुपयांचा निधी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.