आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिवेशनावर १० लाखांचा मराठा मोर्चा! राज्यातील प्रतिनिधींची मुंबईत बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटाबंदीआधी राज्यात सर्वत्र मराठा आरक्षण क्रांती मोर्चाची चर्चा असताना ८ नोव्हेंबरनंतर मात्र चित्र बदलले आणि फक्त काळ्या-पांढऱ्या पैशांविषयीचाच विषय सर्वत्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाचे काय झाले, असा प्रश्न विचारला जात असताना वडाळा येथे राज्यभरातील मराठा प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. या वेळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर १४ डिसेंबरला धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मोर्चात राज्यभरातून तब्बल १० लाखांच्या संख्येने मराठा समाज सहभागी होणार असून कुणबी समाजाची मोठी साथ त्यांना या वेळी मिळणार आहे.

वडाळ्याच्या सभेत अमरावती येथे झालेल्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. गेले दोन अडीच महिने राज्यभर सर्वत्र मराठा मोर्चा निघाले होते. या मोर्चानंतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती आहे, याचा आढावा यावेळी घेण्यात आला. यानंतरजिल्हा समितींकडून नागपूर मोर्चासाठी जिल्हानिहाय प्रत्येकी पाच प्रतिनिधींची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रतिनिधी आपापल्या जिल्ह्यांमधून मोर्चात सहभागी होणाऱ्यांच्या तयारीवर लक्ष ठेवणार आहेत. मराठा आरक्षणाविषयी ७ िडसेंबरला उच्च न्यायालयात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वेळी मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मराठा समाजाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावरून फिरत आहेत. मात्र, राज्य बंदच्या या अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन मराठा मोर्चा आयोजकांनी केले आहे. दरम्यान, या बैठकीला राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.

मुंबईत ५० लाखांचे नियोजन
अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणािवषयी निर्णय न घेतल्यास मुंबईत महामोर्चा आयोजित करण्याचा निर्धार करण्यात आला. यात राज्यभरातून ५० लाख मराठा रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय झाला. मुंबईतील मराठा समाजाच्या बाइक रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात ७० हजार दुचाकीस्वार सहभागी झाले होते. महामोर्चातही मोठ्या संख्येने समाजाचे लोक सहभागी होतील, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...