आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटकळवर 10 लाखांचे इनाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुणे, मुंबई, अहमदाबादसह देशभरातील विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार व इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळसह त्याच्या तीन साथीदारांवर ‘एटीएस’ने सोमवारी प्रत्येकी दहा लाखांचे इनाम जाहीर केले आहे. दोन वर्षांपूर्वीच दिल्ली पोलिसांनीही भटकळबाबत माहिती देणा-या स 15 लाखांचे इनाम जाहीर केले आहे.

‘एसटीएस’चे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अतिरेकी मोहंमद अहमद सिद्धीबाप्पा ऊर्फ यासीन भटकळ, तहसीन अख्तर वासीम अख्तर शेख, असदुल्ला अख्तर जावेद व वकास ऊर्फ अहमद यांचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. या चौघांचीही छायाचित्रे ‘एटीएस’ने प्रकाशित केली असून माहिती देणा-यांना प्रत्येकी 10 लाखांचे इनाम दिले जाणार आहे.

इथे संपर्क साधा
09619122222, 08652012345 किंवा 022- 23791619 या क्रमांकावर अतिरेक्यांविषयी माहिती द्यावी. किंवा atswantedaccused@gmail.com किंवा atswantedaccused@yahoo.co.in या ई- मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन मारिया यांनी केले आहे. दहशतवादविरोधी लढाईत सहकार्य करणा-या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवले जाईल,असे ते म्हणाले.

13 जुलै 2011 रोजी मुंबईतील झव्हेरी बाजार, दादर व ऑ पेरा हाऊस या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 27 जणांचा मृत्यू झाला होता, तर 120 जण जखमी झाले होते. तहसीनने दादरमध्ये बॉम्ब पेरला होता, तर त्याचे इतर साथीदारही या कटात सहभागी होते.
पुण्यातील जर्मन बेकरी व 1 ऑगस्ट रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातही भटकळसह या चौघांचा हात असल्याचे समोर आले आहे
अहमदाबाद, सुरत, बंगलोर, दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी झालेल्या कारवायांतही त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे एटीएसला मिळाले आहेत.