आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मिनी मंत्रालयासाठी ‘दंगल’; चीत-पट 23 फेब्रुवारीला कळणार; आचारसंहिता लागू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील २५ जिल्ह्यांतील  जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम बुधवारी जाहीर झाला. मराठवाड्यातील ८ जिल्हा परिषदांसह राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुका १६ व २१ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यात होतील. बृहन्मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांसाठी  २१ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. या सर्व निवडणुकांची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होईल. निवडणुकीच्या घोषणेबरोबरच २५ जिल्ह्यांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले.

सहारिया म्हणाले की, पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या १६५ पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील. गडचिरोली जिल्ह्याची दोन्ही टप्प्यांत विभागणी केली आहे. निवडणूक नसलेल्या क्षेत्रांत नियमित विकास कामांसाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत; परंतु निवडणूक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा करता येणार नाही. नागपूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने त्यांचा निवडणूक कार्यक्रमात समावेश नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बृहन्मुंबई वगळता नऊ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होतील. ठाणे, अमरावती व नागपूर महानगरपालिकेतील प्रत्येकी एक प्रभाग तीन सदस्यांचा; तर उल्हासनगर, नाशिक, पुणे व सोलापूर महानगरपालिकेचे प्रत्येकी दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणूक विभागातील उमेदवारासाठी व पंचायत समितीच्या निर्वाचक गणातील उमेदवारासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते ग्रामीण भागातील मतदारांना द्यावी लागतील. 
 
२५ जिल्हा परिषदा
पहिला टप्पा १६ फेब्रुवारी
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली व १६५ पंचायत समित्या.
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : २७ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत
मतदार यादी प्रसिद्ध : १० फेब्रुवारी
 
दुसरा टप्पा: २१ फेब्रुवारी
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील ४ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभागंात (एकूण ११८ पंचायत समित्या)  २१ फेब्रुवारीला मतदान.
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख : १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत
मतदार यादी प्रसिद्ध : १५ फेब्रुवारी
 
१० महापालिका -मतदान : २१ फेब्रुवारी
नाशिक- १२२, पुणे- १६२, सोलापूर- १०२, अकोला- ८०, अमरावती-८७, बृहन्मुंबई- २२७, पिंपरी-चिचवड- १२८, ठाणे- १३१, उल्हासनगर-७८, नागपूर-१५१ (आकडे नगरसेवक संख्येचे)
-उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख :  २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत 
-अर्ज मागे घेण्याची तारीख : ७ फेब्रुवारी
-मतदान चिन्ह वाटप : ८ फेब्रुवारी 
-मतदार यादी प्रसिद्धी :
८ फेब्रुवारी
 
-अर्जासोबत जात, जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांना आवश्यक.
-निकालानंतर सहा महिन्यांत प्रमाणपत्र देणे आवश्यक. 
-अन्यथा त्यांची झालेली निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल.
 

शेवटच्या  स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा....मुंबईत अाव्वाज कुणाचा? युतीबाबत अजून संभ्रमच...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...