आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा परिभाषा काेशांना मिळाली नव्याने मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्या पाच काेशांचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून दहा परिभाषा काेशांना नव्याने मंजुरी मिळवण्यात आली आहे. सामान्यांना परिभाषा काेश लवकर मिळावा यासाठी भाषा संचालनालयाने आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली असल्याचे भाषा संचालक डाॅ. मनीषा कुलकर्णी यांनी ‘ दिव्य मराठी’ला माहिती देताना सांगितले.

मंजुरी मिळालेल्या दहा परिभाषा शास्त्रांमध्ये व्यवस्थापन, जल आणि भूमी व्यवस्थापन, भूगर्भशास्त्र, जलविज्ञान, आहारशास्त्र, याेगशास्त्र या नवीन तंत्रज्ञान विषयांचा समावेश आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत शास्त्रज्ञानामध्ये बऱ्याच प्रमाणात नव्याने भर पडली आहे. त्यामुळे या नवीन ज्ञानाचा समावेश करून काेशांची पुननिर्मिती हाेणे गरजेचे आहे. यासाठी सध्या पाच काेशांचे अद्ययावतीकरण करण्यात येत असून हे काम एकाच वेळी हाती घेण्यात येत आहे. किमान दोन वर्षात तरी काेश जनतेला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.तसेच भारताच्या संविधानाची मराठी व इंग्रजी भाषेतील ‘डिलाॅट’ प्रत गेल्याच महिन्यात भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.