आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Percentages Files Work Completed Which Are Burned In Mantralaya Fire

मंत्रालयाला लागलेल्या आगीत जळालेल्या फाइल्सचे काम 10 % पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंत्रालयात 21 जून 2012 रोजी लागलेल्या आगीत जळालेल्या फाइल्सची केवळ दहा टक्केच पुनर्बांधणी शक्य झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीद्वारे ही बाब उघड झाली आहे. त्यामुळे जळालेल्या फाइल्स पूर्णपणे पुन्हा बांधल्या जातील, हा मुख्यमंत्र्यांचा दावा यानिमित्ताने फोल ठरला आहे.

आगीत 31 विभागांच्या 63,349 फाइल्स जळाल्याची माहिती सरकारने दिली. गेल्या 6 महिन्यांत या विभागांतील केवळ 6339 फाइल्सचीच पुनर्बांधणी शक्य झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गृह विभाग 11065, परिवहन आणि बंदरे 4120, मदत पुनर्वसन 200, तर शालेय आणि क्रीडा विभागाने जळालेल्या 244 फाइल्सपैकी अद्याप एकाही फाइलची पुनर्बांधणी केली नसल्याचे स्पष्ट झाले.

महसूल विभागाने जळालेल्या 5803 पैकी 3717 फाइल्सची पुनर्बांधणी केली आहे. गृहनिर्माण विभागाने 229 पैकी 157, विधी व न्याय विभागाने 133 पैकी 104, अन्न नागरी पुरवठा विभागाने 20 पैकी 19, तर भाषा विभागाने जळालेल्या सर्वच म्हणजे 12 आणि स्वयंरोजगार विभागाने चारच फाइल्सची
पुनर्बांधणी केली आहे.