आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे अंडरवर्ल्डचा \'डॅडी\',10 पॉईंट्समधून जाणून घ्या दूध विक्रेता कसा बनला \'डॉन\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गॅंगस्टर अरुण गवळीच्या जीवनावर आधारीत सिनेमा 'डॅडी' 8 सप्टेंबरला रिलीज होत आहे. अरुण गवळी सध्या नागपूर तुरुंगात कैद आहे. शिवसेना नेत्याची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सिनेमाच्या प्रीमियरमध्ये सहभागी होण्याची अरुण गवळीची खूप इच्छा होती. मात्र त्याला कोर्टाने परवानगी दिली नाही.  दरम्यान, गवळी दरवर्षी गणेशोत्सवात पॅरोलवर तुरुंगाबाहेर येतो.

10 पॉईंट्समधून जाणून घ्या एक दूध विक्रेता कसा बनला अंडरवर्ल्ड डॉन...
#1. मध्यप्रदेशातून मुंबईत आले होते वडील
- मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून अरुण गवळीचे वडील गुलाबराव हे कामाच्या शोधात मुंबईत आले होते.
- घरात अठराविश्व दारिद्र्यामुळे अरुण गवळीने पाचवीत शाळेला रामराम ठोकला होता. नंतर त्याने दूध विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता.

#2. असा आला दाऊदच्या संपर्कात...
- अरुण गवळी 1980 मध्ये राम नाईकच्या गॅंगमध्ये सहगाभी झाला. यादरम्यान त्याची दाऊद आणि छोटा राजनसोबत मैत्री झाली. तो त्यांच्यासाठी काम करू लागला.
- यादरम्यान अरुण गवळीच्या भावाची गॅंगवारमध्ये हत्या करण्‍यात आली.
- गवळीने स्वत:ची गॅंग बनवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निर्णयाने दाऊद-गवळीमध्ये शत्रुत्त्व निर्माण झाले.

#3. दाऊद दुबईला पळून गेल्यानंतर गवळीने मुंबईवर केले एकछत्र राज....
 - 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटनंतर अंडरवर्ल्डचा पूर्ण नक्षा बदलून गेला. स्फोटांच्या आधीच डॉन दाऊद इब्राहिम कासकर दुबईत पळून गेला होता.
- दाऊद आणि छोटा राजन देखील विभक्त झाले होते. छोटा राजनने देखील मलेशिया स्वत:चा बिझनेस सुरु केला होता. नंतर मुंबईवर गवळीचेच राज्य होते.
- सुरुवातीच्या काळात गवळीचे राज्य केवळ सेंट्रल मुंबईतील दगडी चाळमध्ये चालत होते. नंतर त्याच्या गँगची दहशत संपूर्ण मुंबईत पसरली होती.

#4. दगडी चाळमध्ये होता गवळीचा अड्डा
 - 80 आणि 90च्या दशकात गुन्हेकारीमुळे बदनाम भायखळाच्या स्लम एरियातील दगडी चाळमध्ये गवळीचे घर होते.
- दूध विकून तो कुटुंबाचे पालनपोषण करत होता. डॉन बनल्यानंतर त्याला सगळे 'डॅडी' असे संबोधत होते.

#5. पुण्यात मिळाले 'डॅडी' हे नाव
- पुणे शहरातील लोकांना अरुण गवळीला 'डॉन' हे नाव दिले आहे.
- 1990 मध्ये टाडा कोर्टाने गवळीला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवले होते.
- तुरुंगात कैदी त्याला 'डॉन' असे संबोधत होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो 'डॅडी' नावाने फेमस झाला होता.

#6. स्वत:चा काढला राजकीय पक्ष
- पुण्यातील चिंचवडमध्ये गवळीचे चांगले वर्चस्व होते. 'अखिल भारतीय सेना' नावाने त्याने स्वत:चा राजकीय पक्ष सुरु केला होता.
- गवळीने या पक्षाच्या तिकीटावर चिंचपोकळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली व नंतर तो आमदार बनला.

#7. कधीकाळी शिवसेना करत होती सपोर्ट...
- कधीकाळी शिवसेना अरुण गवळीला सपोर्ट करत होती.
- गवळी गॅंगने शिवसेनाचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकरची हत्या केली होती. त्यानंतर शिवसेना आणि गवळीचे संबंध कायमचे संपुष्टात आले होते.

#8. मुलगी आहे नगरसेविका
- अरुण गवळीचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला.  विधानसभा सदस्य आशा गवळी यांच्यासोबत त्याचा विवाह झाला.
- गवळीला दोन मुले आहेत. मुलीचे नाव गीता गवळी. ती नगरसेविका आहे. मुलाचे नाव महेश गवळी असे आहे.

#9. अरुण गवळीवर हे आहेत आरोप...
- 1986 मध्ये कोबरा टोळीचा सदस्य पारसनाथ पांडेय आणि सशी राशमच्या हत्येचा आरोप
- शिवसेनेचे आमराद रमेश मोरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू जयंत जाधव तसेच आमदार जौद्दीन बुखारी यांच्या हत्येचा आरोप
- 2007 मध्ये शिवसेनेचे महापौर कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी देण्याचा आरोप.

#10. जीवनावर बनले दोन सिनेमे...
- मराठी चित्रपट ‘दागडी चाळ’ (2015)
- हिंदी सिनेमा 'डॅडी' 8 सप्टेंबरला रिलिज होत आहे.
- 'डॅडी'मध्ये अभिनेता अर्जुन रामपाल हा अरुण गवळी भूमिका करतोय.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...