आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Thousand Crores Chit Fund Fraud In Maharashtra Kirit Somayya

महाराष्‍ट्रात 10 हजार कोटींचा चिट फंड गैरव्यवहार झाला - किरीट सोमय्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील चिट फंड व पोन्झी कंपन्यांबाबत मी दीड वर्षापासून आवाज उठवत असूनही गृह विभागाने काहीही कारवाई केली नसल्याचे सांगून या भ्रष्टाचाराला राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत केला. या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्यात यावी म्हणून त्यांनी मुख्य गृहसचिव अमिताभ राजन यांची सोमवारी भेट घेऊन कागदपत्रे सुपूर्द केली.


त्यानंतर मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी सांगितले की, राज्यात एकूण शंभर कंपन्यांनी दहा हजार कोटींचा घोटाळा केला असून यात दहा लाख मध्यमवर्गीयांचा पैसा गुंतला आहे. दीड वर्षापासून राज्यातील चिट फंड आणि पोन्झी कंपन्यांविषयी आपण आवाज उठवत आहोत. औरंगाबाद, अमरावती, परभणी येथे कार्यालय असलेली सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया लि. स्पीक एशिया, एमएमएम, राज इन्व्हेस्टमेंट, युनिप 2 यू डॉट कॉम आदी कंपन्या कार्यरत असून यापैकी काही कंपन्यांवर दुसºया राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र या कंपन्यांचा अड्डा असून जळगाव येथील समृद्धी जीवन फूड योजनेबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या संचालकांकडून 65 लाख रुपयांची लाच घेतल्याचे लाचलुचपत संचालनालयाने पोलिसांना अटक केली. परंतु आजही ही कंपनी सुरू असून या कंपनीच्या एजंटच्या कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी केल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.


मुख्यमंत्र्यांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना या कंपन्यांबाबतची कागदपत्रे दिली, परंतु या कंपन्या बंद होण्याऐवजी त्यांचा व्यवसाय भरभराटीस आल्याचे दिसून येत आहे. त्यावरून घोटाळ्याला मंत्री आणि राजकारण्यांचा वरदहस्त आहे, हे स्पष्ट होते. आता सचिव स्तरावर कागदपत्रे देऊन चौकशी करण्याची मागणी आपण करीत आहोत. याची चौकशी न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.


कंपन्यांकडून मंत्र्यांना महागड्या भेटी
मंत्र्यांनी पाठपुरावा न केल्याने तुम्ही न्यायालयात का गेला नाहीत, असे विचारले असता सोमय्या म्हणाले की, न्यायालयात जाण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्या आता आम्ही पूर्ण करीत आहोत. लोकसभेत देशभरातील चिट फंड कंपन्यांची माहिती दिली. त्यात महाराष्ट्रात एकही कंपनी नसल्याचे दाखवण्यात आले आहे, असे सांगून किरीट सोमय्या म्हणाले की, यावरूनच राज्यातील मंत्री व नेते या कंपन्यांना कसे पाठीशी घालत आहेत ते दिसून येत आहे. या मंत्र्यांना महागड्या भेटी या कंपन्यांतर्फे देण्यात येत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.