आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Thousand Sixty Farmers Committed Suicide In Maharashtra

महाराष्‍ट्रात साडे दहा हजार शेतकर्‍यांच्या आत्महत्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वर्ष 2001 ते 2012 यादरम्यान महाराष्‍ट्रात एकूण 10 हजार पाचशे एकसष्‍ट शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे. यात पश्चिम विदर्भातील एकूण आठ हजार तीनशे बावन्न शेतक-यांचा समावेश आहे ,अशी माहिती मदत व पुर्नवसन मंत्री पतंगराव कदम यांनी विधानसभेत एका लिखित प्रश्‍नाला उत्तर देताना दिली.

बुलढाणा जिल्ह्यात सन 2012 मध्‍ये एकूण 153 शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून त्यातील 66 शेतक-यांच्या कुटूंबांना मदत देण्‍यात आली. मराठवाडा विभागातील बीडमधील गेवराई तालुक्यात 2001 ते 2012 यादरम्यान 102 शेतक-यांनी आत्महत्या केले. यापैकी 55 प्रकरणे पा‍त्र ठरली तर 44 प्रकरणे अपात्र ठरली. गेल्या 12 वर्षा‍त आत्महत्या केलेल्या 58.64 टक्के शेतक-यांच्या कुटूंबांना मदत देण्‍यात आल्याची माहिती कदम यांनी दिली. आत्महत्या रोखण्‍यासाठी पंतप्रधान 3750 कोटी व मुख्‍यमंत्री निधीतून 1075 कोटींचा पॅकेज जाहीर करण्‍यात आले आहे. हे दोन पॅकेज जाहीर करून ही आत्महत्या थांबत नसतील तर,त्याचा उपयोग तरी काय असा प्रश्‍न निर्माण होतो.