आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-अहमदाबाद रेल्वेत 100 टक्के बुकिंग; उत्पन्न घटल्याच्या बातम्यांचे गोयलांकडून खंडन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई - अहमदाबाददरम्यान  सर्व रेल्वे गाड्यांत १०० टक्के बुकिंग असल्याचे पश्चिम रेल्वेकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही टि्वट करून या मार्गावर चांगले उत्पन्न असल्याचे म्हटले आहे.  

आयरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई- अहमदाबाद मार्गावर प्रवासी मिळत नसून ४० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे सांगून रेल्वेला ३० कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचे म्हटले होते. गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यातून ही माहिती मागवल्याचे म्हटले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले की, या बातम्या चुकीच्या अाहेत. या मार्गावर रेल्वेला १०० टक्के बुकिंग मिळते.  त्यामुळे भविष्यात होणाऱ्या बुलेट ट्रेनलाही प्रवासी प्रतिसाद देतील, असेही म्हटले आहे.  पश्चिम रेल्वेच्या माहितीनंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या वृत्ताला दुजाेरा दिला आहे.    

तीन महिन्यांत २३३ कोटींचे उत्पन्न  
या रेल्वेमार्गावर  तीन महिन्यांत रेल्वेला २३३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच जून ते सप्टेंबरदरम्यान या मार्गावर १०० टक्के बुकिंग मिळाले आहे.  त्यामुळे या मार्गावर रेल्वेला प्रवासी मिळत नाहीत हे वृत्त चुकीचे आहे, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी  रवींद्र भटकर म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...