आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पसंख्याकांसाठी १०० कोटी - नक्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारकडून राज्याच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक अर्थसाहाय्य विकास महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. अल्पसंख्याकांना अर्थसाहाय्य व सवलतीत कर्जपुरवठा करण्यासाठी ही मदत मिळणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. राज्याचे अल्पसंख्याकमंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राज्यातील अल्पसंख्याक योजनांचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.

राज्य सरकारने हमी दिल्यानंतर केंद्र महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती नक्वींनी दिली. ते म्हणाले, केंद्रीय निधीतून मिळणा-या योजना व निधीचा वापर करण्याचा वेग राज्याने वाढवावा. पाहिजे. अल्पसंख्याकांसाठी एक हजार शाळा उघडण्याच्या मोहिमेत महाराष्ट्राला फक्त ३८ टक्के यश आले आहे. इतर योजना लागू करण्यातही राज्य शासन ३० ते ४० टक्क्यांवरच अडकले आहे. यापूर्वीच्या योजना किती प्रमाणात यशस्वी झाल्या त्यावर पुढील निधीचे प्रमाण ठरत असते.