आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमनचे शंभर किलाे वजन एका महिन्यात घटवणार, डॉ. मुफ्फजल लकडावाला यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वजन घटवण्यासाठी इजिप्तहून मुंबईत दाखल झालेल्या ५०० किलो वजनी इमन अहमदचे येत्या चार आठवड्यात ८० ते १०० किलो वजन घटवण्यात येईल, अशी माहिती सैफी रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर मुफ्फजल लकडावाला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी यमनची बहीण सैमा सलिमची उपस्थिती होती.  

शनिवारी विशेष विमानाने ३६ वर्षीय इमनला मुंबईत आणण्यात आले. या वेळी क्रेनच्या साहाय्याने तिचा पलंग रुग्णालयात नेण्यात आला. इमनला मधूमेह, अतितणाव आणि इतर आजार आहेत. डॉ. लकडावाला म्हणाले, ‘आपल्या अतिवजनामुळे इमनने वयाच्या ११ वर्षांपासून शाळेत जाणे बंद केले. तिच्या देखरेखीसाठी सध्या आठ महिला कर्मचारी आहेत.   तसेच १५ तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करतील. येत्या चार आठवड्यांत इमनचे ८० ते १०० किलाने वजन घटवण्यात येईल. तीन दिवसांपूर्वीच तिला अॅडमिट केलेली  खोली अत्यावश्यक सुविधांनी सज्ज ठेवण्यात अाली अाहे. तिचे वजन कमी करणे खूप आव्हानात्मक आहे. मात्र, १०० किलाे वजन कमी झाल्यानंतर ती स्वत: उभी राहू शकेल.’

बीएमअाय दहा पट जास्त
इमनची त्वचा खडकासारखी टणक आहे. आधी त्यावर उपचार करून नंतर शस्त्रक्रिया करण्यात येईल. इमनचा बीएमआय (बाॅडी मास इंडेक्स) २५२ एवढा आहे. सर्वसाधारण अाराेग्य असलेल्या व्यक्तीचा बीएमआय २४ एवढाच असतो. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला इजिप्तला पाठवण्यात येईल. त्यानंतरही आमच्या डॉक्टरची टीम तिच्यावर लक्ष ठेवून असेल, असेही डाॅ. लकडावाला यांनी सांगितले.

सुषमा स्वराज यांचे आभार
इमनला भारतात आणण्यासाठी प्रचंड अडचणी हाेत्या.  मात्र डाॅ. लकडावाला यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना याबाबत माहिती दिली. त्यावर स्वराज यांनी समनच्या व्हिसाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले. त्यामुळे एका दिवसांत तिला भारताचा व्हिसा मंजूर झाला. त्यासाठी मी सुषमा स्वराज यांचे आभार मानतो, असेही डाॅ. लकडावाला यांनी सांगितले.
 
इमन सलमानची चाहती  
इमनला बॉलीवूडचे चित्रपट पाहणे आवडते. सलमान खान हा तिचा आवडता अभिनेता असल्याचे इमनची बहीण सैमा हिने सांगितले. नुकतेच तिने महानायक अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचेही चित्रपट पाहिले आहेत. इमन लवकरात लवकर बरी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा, अशी विनंती करताना सैमा यांच्या भावना अनावर झाल्या हाेत्या.
बातम्या आणखी आहेत...