आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाज्यांचे भाव भिडले गगनाला; मुंबईकरांना मिळणार स्वस्त भाज्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाज्यांचे दर गगणाला भिडल्याने मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. किरोकोळ भाजी विक्रेत्यांनी भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवल्यानंतर आता राज्य सरकारने यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात मुंबईकरांना स्वस्त भाज्या म‍िळणार आहे.

मुंबईकरांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत शंभर भाजी विक्री केंद्र राज्य सुरू केली जाणार आहेत. येत्या सोमवारपासून मुंबईकरांना स्वस्त भाज्या उपलब्ध होईल, अशी माहिती पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

शेतकर्‍यांचा भाजीपाला थेट मुंबईत आणण्यात येणार असून, यामुळे भाजीच्या दरांत 30 टक्के फरक पडेल, असा विश्वास विखे- पाटील यांनी व्यक्त केला. हा उपक्रम 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. तसेच
नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटमधून घाऊक बाजारात भाजी खरेदी करून ती त्याच दरात मुंबईतील या केंद्रांवर विकली जाणार आहे.

अपना बाजार- हिंदमाता टॉकीज, नायगाव-दादर, अपना बाजार-सरदार नगर क्रं. 1 सायन कोळीवाडा, अपना बाजार-टिळकनगर, चेंबूर, अपना बाजार-आरसीएफ कॉलनी, चेंबूर, अपना बाजार-पंतनगर पोलीस स्टेशन, घाटकोपर, अपना नगर- आझाद नगर, अंधेरी, अपना बाजार-जे एल नेहरू रोड, मुलुंड वेस्ट, सुपारी बाग कंझ्युमर को.ऑ.सोसायटी, लागबाग-परेल, अपना भंडार, शंकरराव चौक, नगरपरिषद शाळा, कल्याण वेस्ट, सहकार बाजार, कळवा ठाणे आदी ठिकाणी स्वस्त भाजी मिळणार आहे