आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्मशताब्दी वर्ष: आयर्न लेडी इंदिरा गांधी यांना राज्यात ठिकठिकाणी अभिवादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आज जन्मशताब्दी (१७ नोव्हेंबर १९१७) वर्ष आहे. गेले वर्षभर इंदिराजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रदेश महाराष्ट्र काँग्रेसकडून शनिवारी जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आदी राज्यातील मोठ्या शहरांसह ठिकठिकाणी इंदिराजींच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्याचे आयोजन केले होते. यासाठी काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेस सरचिटणीस  जनार्दन त्रिवेदी, मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बड्या नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली. देशाची दुर्गा म्हणून ओळख...

 

 

- देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांची मुलगी इंदिरा गांधीचे नाव लहानपणी इंदिरा प्रियदर्शनी होते.
- 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी इंदिरांना इंदू याच टोपणनावाने सर्व आवाज देत असे. नेहरूंची ती एकुलती एक मुलगी होती.
- इंदिरांचे नाव त्यांचे आजोबा पंडित मोतीलाल नेहरू यांनी ठेवले होते. इंदिरा नावाचा अर्थ होतो, नितळ कांती, लक्ष्मी आणि शोभा.
- इंदिरांनी नेहरूनंतर काँग्रेसमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले. पुढे पंतप्रधान बनल्या. देशाच्या त्या सर्वाधिक धाडसी पंतप्रधान म्हणून गणल्या गेल्या. त्यामुळेच इंदिराजींना त्या काळी दुर्गा असे म्हटले जायचे.

 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, इंदिरा गांधीच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळ्यातील फोटोज....

बातम्या आणखी आहेत...