आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE: PM Narendra Modi Addresses Indian Science Congress In Mumbai University

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईत सायन्स काँग्रेसचे उद्घाटन, नोबेल विजेत्यांचा सत्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई विद्यापीठात 102 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिमाखात झाले. पाच दिवस चालणा-या या विज्ञानाच्या मेळाव्याला देशभरातील 12 हजार शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने जगभरातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक व विज्ञानप्रेमी दाखल झाले आहेत. या परिषदेच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आणखी लोकाभिमुख करण्याचा आणि शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये मोदी काय म्हणाले उद्घाटन समांरभ भाषणात....
- ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांना मोदींनी वाहिली श्रद्धांजली
- सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होणे हा माझा सन्मान
- वैज्ञानिकांच्या कामाने मी भारावून जातो
- मानवाचा विकास हा तंत्रज्ञानाशी निगडीत
- जगभरातले नोबेल पारितोषिक विजेते सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे मोदींकडून स्वागत
- नेहरूंनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व दिले
- भारताची जडणघडण विज्ञानामुळे झाली
- नवे शोध, संशोधन गरीबांपर्यंत पोहचायला हवे
- खासगी क्षेत्रानाहे संशोधनाला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे
- आपल्या संशोधक, शास्त्रज्ञांमुळे भारत देश अनेक बाबतीत स्वंयपूर्ण
- निधी उपलब्ध न झाल्याने संशोधनाला खीळ बसते
- भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मोठी परंपरा आहे. मी भारतातील शास्त्रज्ञांना आवाहन करतो की तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाला बदलावयला हवे
- विज्ञान व तंत्रज्ञानाची गोडी समाजातील सर्व घटकांना लावायला हवी
- गरीबी दूर करण्यासाठी विज्ञानाची मदत होते. भारताला समृद्ध करण्यासाठी संशोधनावर भर द्या- मोदी
- मानवी जीवनाचा स्तर उंचावण्याची क्षमता केवळ विज्ञान क्षेत्रातच- मोदी
- भारतीय शास्त्रज्ञांत जग बदलण्याची पुरेपूर क्षमता, मंगळयान अभियान पहिल्या प्रयत्नात यशस्वीरित्या पाठवून आपण ते सिद्ध केले आहे- मोदी
- विज्ञान हे मानवी मेंदूचे उत्पादन आहे. पण या मेंदूला ह्दय चालवत असते. त्यामुळे मानवी जीवन समृद्ध करणे हेच ध्येय असले पाहिजे- मोदी
- इंडियन सायन्स काँग्रेस ही 100 वर्षाची संस्था आहे ज्याचे मला फार कौतुक आहे- मोदी
- सायन्स काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नोबेल विजेत्यांचा सत्कार
- संशोधक, शास्त्रज्ञ यांच्यासह विविध क्षेत्रात भरीव योगदान देणा-यांचाही सत्कार.
पुढे आणखी पाहा...