आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात १०३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील १०३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढण्यात आले अाहेत. एस. एस. सोेळुंके यांची अमरावती, तर आर. पी. सेनगावकर यांची सोलापूरच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीण, बीड, हिंगोली, परभणी, धुळे, नंदुरबार, अमरावती ग्रामीण, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ व अहमदनगर या जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपमहानिरीक्षकपदी, तर याच विभागात उपमहानिरीक्षक असलेल्या आर. एस. खैरे यांना पुणे दहशतवादी प्रतिबंधक पथकाचे (एटीएस) उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे. परभणीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियती ठकेर यांना याच जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. ३ डीआयजी, १३ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ८७ पोलिस अधीक्षक, सहायक पोलिस अधीक्षक यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नाव सध्याचे पद नियुक्तीचे ठिकाण
आर. एस. खैरे डीआयजी सीआयडी डीआयजी एटीएस, पुणे
पी. एन. रासकर सोलापूर आयुक्त अतिरिक्त आयुक्त, पुणे
एस. एस. सोळुंके अतिरिक्त आयुक्त पुणे आयुक्त, अमरावती.
आर. पी. सेनगावकर प्राचार्य खंडाळा प्रशिक्षण केंद्र आयुक्त सोलापूर.
रामनाथ पोकळे पोलिस अधीक्षक, वाशीम पो. अधीक्षक, सीआयडी
अनंत रोकडे पोलिस अधीक्षक, परभणी पोलिस अधीक्षक-नागपूर.
अनिल पारसकर पोलिस अधीक्षक, वर्धा पोलिस अधीक्षक, बीड.
एन. अंबिका पाेलिस अधीक्षक, हिंगोली उपायुक्त नाशिक.
के. ए. कणसे पोलिस अधीक्षक, भंडारा पोलिस अधीक्षक, हिंगोली.
शिरीष सरदेशपांडे पो. अधीक्षक एसीबी नांदेड पो. अधीक्षक, एसीबी पुणे.
एस. एम. परोपकारी अ.अधीक्षक, सोलापूर पो.अधीक्षक, एसीबी नांदेड.
बी. यू. भांगे अ. अधीक्षक, उस्मानाबाद पो. उपायुक्त, एसआयडी,
एस. वाय. धिवरे पोलिस अधीक्षक, नागपूर अ. अधीक्षक, नांदेड.
प्रणय अशोक सहायक अधीक्षक, परभणी अ. अधीक्षक, गडचिरोली.
पंकज देशमुख सहायक अधीक्षक, नांदेड अतिरिक्त अधीक्षक, नगर.
ए. जे. गावकर सहायक अधीक्षक, बिलोली अ. अधीक्षक परभणी.
नियती ठकेर अतिरिक्त अधीक्षक, परभणी पोलिस अधीक्षक, परभणी.
सौरभ त्रिपाठी राज्यपाल यांचे एडीसी पोलिस अधीक्षक, अहमदनगर.
व्ही. बी. देशमुख पोलिस उपायुक्त मुुंबई पोलिस उपायुक्त नाशिक
एस. बी. फुलारी पोलिस अधीक्षक अकादमी, नाशिक पोलिस अधीक्षक, सांगली.
बातम्या आणखी आहेत...