आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैभववाडी तालुक्याचा सर्वाधिक 98.45 टक्के निकाल; याही वर्षी मुलींचीच बाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैभववाडी (सिंधुदुर्ग):  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला. वैभववाडी तालुक्याचा एकूण ९८.४५ टक्के निकाल लागला आहे. तालुक्यातील १८ विद्यालयातून एकूण ७७७ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. यापैकी ७६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील १८ शाळांपैकी ११ शाळेंचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातून माधवराव पवार विद्यालय कोकीसरे या विद्यालयाचा कु. निनाद मिलिंद साळी हा विद्यार्थी ९५.६० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम आला आहे, तर अभिनव विद्या मंदिर सोनाळी या विद्यालयाची कु. श्रृति लिलेश पटेल ही ९४.२० टक्के गुण मिळवत व्दितीय, तर शोभना नारायण विद्यालय नानिवडे या विद्यालयाचा कु. प्रणय राजेंद्र तांबे याने ९३.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या ही वर्षी कोकणकन्या एक्सप्रेस सुसाट धावली आहे.
 
शाळा निहाय निकाल पुढीलप्रमाणे:
आदर्श विद्या मंदिर तात्यासो मो.स.मोरे कनिष्ठ महाविद्यालय भुईबावडा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ४१ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून प्रथम कु.भक्ती प्रकाश मोरे (९०.६०%), व्दितीय श्रृतीका सुरेश मोरे (८८.४०%), तृतीय सिध्देश सुभाष मोरे (८६.४०%).
 
अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी एकूण निकाल ९७.७७ टक्के लागला आहे. एकूण ९० विद्यार्थी बसले होते. यापैकी ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून प्रथम ओंकार सुर्यकांत सावंत (८६.६०%), व्दितीय उमेश सुरेश गुरखे (८५.४०%), तृतीय स्नेहा तानाजी पवार (८४.२०%).  
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय नेर्ले-तिरवडे एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ३३ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम जान्हवी अमित खानविलकर (८६.४०%), व्दितीय कांचन दिपक पाटील (८६%), तृतीय धीरज अनंत खानविलकर(८१%).
 
कुर्ली माध्यमिक विद्यालय कुर्ली. एकूण निकाल ९६ टक्के लागला आहे. एकूण २५ विद्यार्थी बसले होते. यापैकी २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयातून प्रथम कु. प्रणय सखाराम कोकरे (८७.८०%), व्दितीय कु. वैष्णवी राजीव पाटील (८५.८०%), तृतीय संदेश अनिल राणे (८१.२०%), रितेश रमेश हुंबे (८१.२०%).
 
माध्यमिक विद्यालय करुळ एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ३७ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु. ओमकार राजेंद्र वारंग (८४.२०%), व्दितीय परेश दिपक शिंगरे (८४%), कु. आकाश सुर्यकांत माळकर (८४%), तृतीय मानसी सुधीर पडवळ(८३%).

उर्दू माध्यमिक विद्यालय कोळपे.एकूण निकाल ९७.४३ टक्के लागला आहे. एकूण ३९ विद्यार्थी बसले होते. यापैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु. मुस्कान शहाबान रमदुल (८१.६०%), सुबहान उस्मान लांजेकर (८१.६०%), व्दितीय शैबाज अल्लिमियाँ ठाणगे(८०.८०%), तृतीय अरमान बाबालाल लांजेकर(८०.६०%).
    
न्यू इंग्लिश स्कूल हेत. एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. एकूण ४८ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु. मानसी रघुनाथ उपडे (८२%), व्दितीय प्रज्ञा राकेश जाधव (८१%), तृतीय अक्षता अशोक पाटेकर (७९.६०%).
 
मधुकर सिताराम भुर्के विद्यालय मांगवली. एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ४९ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु. वैभव शिवाजी पाटील (८९.८०%), व्दितीय कु.शितल राजाराम गोठणकर (८६.२०%), तृतीय रुपेश विजय आयरे (८३.२०%).
      
यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आचिर्णे एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु.राणी मारुती कर्पे (८३.६०%), व्दितीय कु. कृणाल दिपक तेली (८३.५०%), तृतीय किशोरी विजयकुमार कोणे (८३%).
    
माध्यमिक विद्यालय लोरे.एकूण ९७.६७ टक्के निकाल लागला आहे. एकूण ४३ विद्यार्थी बसले होते. यापैकी ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु. वृतीक्षा तानाजी गोसावी (८७.२०%), व्दितीय तुषार तुकाराम बावडेकर (८३.२०%), तृतीय आकांक्षा गजानन सावंत (८२.८०%).
 
नवभारत हायस्कूल कुसूर. एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण १९ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु. आम्रपाली प्रकाश कांबळे (८०.१४%), व्दितीय कु.तेजश्री विठोजी पाटील (७४%), तृतीय कु.तन्मय ओमप्रकाश सावंत (७१%).   
 
अभिनव विद्यामांदिर सोनाळी. एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण २९ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून कु. श्रृती निलेश पाटील (९४.२०%), व्दितीय कु.क्षिती सुधाकर साळुंखे (९२%), तृतीय कु.सेजल भागोजी गुरखे(९१.
८०%).
 
माधवराव पवार माध्यमिक विद्यालय कोकीसरे. एकूण ९९ टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातून कु.निनाद मिलींद साळी (९५.६०%), व्दितीय कु. आसावी पांडुरंग काळे (९२.८०%), तृतीय कु.पूजा दत्तात्रय गिरी (९२.६०%).   
 
विकास विद्यालय सडूरे अरुळे.एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण २८ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु.अक्षता श्रीपत सुतार (८३%), व्दितीय कु.निकीता भास्कर सावंत (८२.८०%), प्रथमेश मनोज रावराणे (८२.८०%), तृतीय आदित्य सचिन तावडे(७९.८०%).   
 
माध्यमिक विद्यालय उंबर्डे. एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण २८ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु.प्रचिता चंद्रकांत दळवी (८७.४०%), व्दितीय कु.भालचंद्र सुरेश खेडेकर (८६.६०%), तृतीय कु.आरती किसन राठोड (८३.४०%).
      
अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे. एकूण ९४ टक्के निकाल लागला आहे. एकूण ५० विद्यार्थी बसले होते. यापैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु. अरुणाराणी सुर्यकांत तोंडवलकर (८२.४०%), व्दितीय कु. उत्कर्षा अनिल नारकर (७७.४०%), तृतीय अक्षय वसंत डफळे (७१.६०%).  
  
स्वामी विवेकानंद विद्यालय तिथवली. एकूण निकाल ९४ टक्के लागला आहे. एकूण ५० विद्यार्थी बसले होते. यापैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु.मयुर राजेंद्र हरयाण (८९%), व्दितीय कु. शुभम सुनिल पाटणकर(८७.८०%), तृतीय कु.शशांक रविंद्र काडगे (८७.२०%).
 
शोभना नारायण विद्यालय नानिवडे. एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. एकूण ११ विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून प्रथम कु.प्रणय राजेंद्र तांबे (९३.८०%), व्दितीय कु. अक्षता जीजी शिळकर (८३.६०%), तृतीय कु.अमोल सुभाष खाड्ये (७०%) याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे.                        
बातम्या आणखी आहेत...