आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या नापासांची जुलैत फेरपरीक्षा; सोमवारपासून अर्ज, यंदाच प्रवेशही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद- दहावीच्या नुकत्याच निकाल लागलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार नाही. नापास विद्यार्थ्यांची जुलै 2015 च्या दुसऱ्या आठवड्यातच पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. 20 ऑगस्टपर्यंत निकालही जाहीर केले जातील. उत्तीर्णांचे शैक्षणिक सत्र सप्टेंबरपासून सुरू होईल. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या दीड लाख विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थींना ही परीक्षा देता येईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.

पुण्यात बुधवारी सर्व बोर्ड अध्यक्षांची बैठक झाली. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे, असे तावडे यांनी सांगितले.

गुणपत्रिकेवर नापासचा कलंक नाही : पुढीलवर्षीपासून शालांत परीक्षेत दहावी उत्तीर्णांना अकरावीसाठी प्रवेश देण्यात येईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी "दहावी उत्तीर्ण कौशल्यविकाससाठी' असे प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे गुणपत्रिकेवर नापास नावाचा कथित सामाजिक कलंक लागणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

वैयक्तिक काउन्सिलिंग : पुढीलवर्षीपासून याच पध्दतीने परीक्षा होईल. पुरवणी परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वैयक्तिक करिअर काउन्सिलिंग केले जाईल. त्यानंतर त्यांच्या अंतर्भूत गुणाप्रमाणे कौशल्यविकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. 50 टक्क्यांहून कमी निकाल लागलेल्या सुमारे 350 शाळांची शिक्षणमंत्री स्वतंत्र बैठक घेणार आहेत.
निर्णयानुसार 50 जूनला दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळतील. तेव्हापासून पुरवणी परीक्षेचे अर्ज स्वीकारले जातील. 15 जुलैदरम्यान प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा होईल. त्यानंतर लेखी परीक्षा होऊन ऑगस्टच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात निकाल लागेल. सप्टेंबरमध्ये प्रवेश घेता येईल.
औरंगाबाद विभागात 21 हजार विद्यार्थी : यानिर्णयामुळे औरंगाबाद विभागात 21 हजार 108, तर जिल्ह्यात हजार 743 विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

औरंगाबाद विभागाची आकडेवारी
नियमित परीक्षार्थी :
160619
उत्तीर्ण : 145472
अनुत्तीर्ण : 15147

पूनर्परीक्षार्थी : 10783
उत्तीर्ण : 4822
अनुत्तीर्ण : 5961

जिल्हानिहाय आकडेवारी : नियमित विद्यार्थी
जिल्हाप्रविष्टउत्तीर्णअनुत्तीर्ण
औरंगाबाद58006532634743
बीड38103362061897
परभणी25036207154321
जालना25280234451835
हिंगोली14194118432351
एकूण16061914547215147
जिल्हानिहाय आकडेवारी : पुनर्परीक्षार्थी
जिल्हाप्रविष्टउत्तीर्णअनुत्तीर्ण
औरंगाबाद410018402260
बीड15701062508
परभणी21765111665
जालना16651003662
हिंगोली1262402866
एकूण1078348225961

अनुत्तीर्ण 15147 विद्यार्थ्यांसह 5961 पुनर्परीक्षार्थींना जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी