आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर तांत्रिक अडचणींसह अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; गोंधळ मात्र कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ कायम असून, आपल्याला कोणते कॉलेज मिळाले या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना रात्री उशीरापर्यंत वाट पाहायला लावणारी पहिली गुणवत्ता यादी अखेर मंगळवारी जाहीर करण्यात आली. यादी जाहीर करण्यात आली असली तरी त्यात असणाऱ्या तांत्रिक अडचणी कायम आहेत.

कट ऑफ नव्वदी पार...
गुणवत्ता यादी जाहीर होण्यास मागील काही दिवसांपासून विलंब होत असल्याने दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच त्यांचे पालक कमालीचे त्रस्त झाले होते. यावर्षी 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे पहिल्या यादीने नव्वदी गाठली आहे.
अकरावीच्या जाहीर झालेल्या सर्वसाधारण यादीत 100 टक्के गुण मिळवलेल्या 14 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर 90 ते 95 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10,991 इतकी आहे. त्यामुळे मुंबईसह नाशिक, औरंगाबादेतील नामांकित कॉलेजचा कट ऑफ नव्वदी पार जाणार अशी शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती.

मुंबईत यंदा अकरावीला 2 लाख 35 हजार 484 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पहिल्या यादीत नाव लागल्यास विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालात कला आणि क्रीडा कोट्यातील गुणांमुळे टक्केवारी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम 11 वीच्या प्रवेशवर दिसून येणार आहे. पुढच्या वर्षीपासून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना तोंडी आणि विज्ञान प्रात्यक्षिकाचे 20 गुण मिळणार नाही.

विद्यार्थी आणि पालकांचा प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम
कुणाला ऑनलाइन एक तर एसएमएसवर वेगळेच कॉलेज मिळाले आहे. एढेच नाही. तर संस्थास्तरावर करण्यात आलेल्या जागांच्या अलॉटमेंट यादीसाठी मंगळवारी 11:30 वाजेपर्यंत कॉलेजांनाही प्रतिक्षा करावी लागली. एढेच करुनही पहिल्या दिवशी प्रवेश मिळूनही तो विद्यार्थ्यांना निश्चित करता आला नाही. या सर्व प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांचा प्रवेशाबाबतचा संभ्रम कायम आहे.

यंदा प्रथमच औरंगाबाद शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ६ जून पासून सुरु करण्यात आलेली ही प्रक्रिया झोन केंद्रांपासूनच वादात राहिली आहे. कधी विद्यार्थ्यांची पळवापळवी तर कधी ऑनलाइन अडचणी या प्रवेश प्रक्रियेत अडथळा ठरल्या आहेत. आज जाहिर करण्यात आलेल्या यादीत पहिल्या फेरीसाठी एकूण १९ हजार ७८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.परंतु चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांची नावे पहिल्या यादीत का नाही ? संस्थास्तरावर अलॉट करण्यात आलेल्या ऑनलाइन आणि प्रत्यक्ष प्रिंट काढलेल्या यादीत फरक आहे,विद्यार्थ्यांनी जे पसंती क्रमांक कॉलेजसाठी दिले आहेत.त्यांचा तर  त्यानुसार नंबरच आला नाही. शिवाय पेमेंट रिसिटची प्रिंटच काढता येत नसल्याने आज  जाहिर झालेल्या अलॉमेंट नंतरही विद्यार्थ्यांना आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करता आलेला नाही. ऑनलाइन यादीतील प्रक्रिया अपडेट होवू शकलेली नाही.अशी माहिती विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासनाने दिली.

असे आहे यादीतील शाखानिहाय जागांचे वाटप
- कला शाखा - २७५३
- वाणिज्य शाखा - ३०१७
- विज्ञान शाखा - १२,३५०
- एचएसव्हीसी - ८१६
एकूण जागांचे वाटप – १९०७८
त्यात ११२८६ मुल आणि ७७९३ मुलींचा समावेश आहे.

विज्ञान शाखेला पहिली पसंती -
दरम्यान आज जाहिर झालेल्या पहिल्या प्रवेश यादी नंतर विद्यार्थ्यांचा कल पाहता प्रथम पसंती ही विज्ञान नंतर वाणिज्य आणि कला शाखेला विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिले आहे. विज्ञान शाखेत सर्वाधिक १२ हजार ३५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

तर शाखा होईल बाद -
विद्यार्थ्यांनी अर्जात पहिला पसंतीक्रम ज्या कॉलेजला दिला आहे.त्याच कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरला आणि त्याने त्या कॉलेजमध्ये आपला प्रवेश निश्चित केला नाही. तर अशा विद्यार्थ्यांची शाखा त्यांना बाद होईल. दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरतांना त्याला तीच शाखा घेता येणार नाही. नियमानुसार त्याला शाखेत बदल करावा लागेल. तरच तो विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज मिळाले असेल त्यांनी प्रवेश टाळताना खबरदारी घ्यावी असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा आहे औरंगाबादेतील कॉलेज निहाय कट ऑफ -

> देवगिरी कॉलेज
 - सायन्स – ९०.६ टक्के
 - कॉमर्स – ९४ टक्के
 - आर्ट्स- ६८ टक्के
 - एचसीव्हीसी - ५५ टक्के

> एस.बी.कॉलेज -
 सायन्स – ९५.६ टक्के
 कॉमर्स – ९१.२ टक्के
 आर्ट्स – ७१ टक्के
 एचएसव्हीसी - ८० टक्के

> मौलाना आझाद कॉलेज
 सायन्स – ९१ टक्के
 कॉमर्स – ६९ टक्के
 आर्ट्स – ५८ टक्के
 एचएसव्हीसी (एमसीव्हीसी)- ८६ टक्के

> विवेकानंद कॉलेज -
 सायन्स – ८८ टक्के
 कॉमर्स – ६० टक्के
 आर्ट‌्स – ४५ टक्के

> वसंतराव नाईक् कॉलेज -
 सायन्स – ९२ टक्के
 कॉमर्स – ८५.८ टक्के
 आर्ट्स – ४०.६ टक्के

सर माझा नंबर का नाही ?
- यादी जाहिर झाल्यावर कॉलेजच्या दिलेल्या पसंती क्रमांकानुसार विद्यार्थी कॉलेजमध्ये आले असता. यादीत नाव नाही,एसएमएस नाही सर मला तर ९५ टक्के गुण आहेत मग माझे यादीत नाव का नाही. असा सवाल केला. नेमके गुणवत्ता यादीत नाव येण्याचे निकष तरी शिक्षण विभागाने काय ठेवले आहेत. हेच समजले नसल्याचे कॉलेजांमधील प्राचार्यांनी सांगितले.

इंग्रजी माध्यमासाठी एस.बी.मौलाना आझादला पसंती -
दरम्यान कॉमर्स,आर्ट्स ज्यांना इंग्रजी माध्यमातून कारायचे आहे.अशा विद्यार्थ्यांनी पहिली पसंती मौलाना आझाद आणि एस.बी.कला आणि वाणिज्य महाविद्यालयास दिली आहे.

कला शाखेचाही डंका -
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रशासकीय,सोशल सायन्स मधील करिअरच्या संधी पाहता. ९७ टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील कला शाखेला प्रवेश घेतला आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ.जगदीश खैरनार यांनी दिली.  तर इंग्रजी माध्यमातून आर्ट्स शाखेला विद्यार्थी अधिक पसंती देत असल्याचे मौलाना आझाद कॉलेजचे प्राचार्य डॉ.मकदुम फारुकी यांनी सांगितले.

तीन दिवसात प्रवेश कसा ?
संकेतस्थळावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी पाहता तीन दिवसात प्रवेश कसा पूर्ण होणार.शिवाय विद्यार्थ्यांमध्ये अनेक संभ्रम आहेत. याद्यांमध्ये नियमितता नाही. फीस रिसिप्ट अप्टेड नाही. त्यामुळे अडचणी येत असल्याचे वसंतराव नाईक् कॉलेजचे उपप्राचार्य सुभाष चव्हाण यांनी सांगितले.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... चारही याद्यांचे सुधारित वेळापत्रक...
बातम्या आणखी आहेत...