मुंबई/जळगाव - अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्या केटामाइनचा सुमारे 1.2 टनचा साठा केंद्रीय महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) जळगावात शुक्रवारी मध्यरात्री पकडला. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये आहे. येथील रूमखा इंडस्ट्रीजचे नितीन चिंचोले आणि मुंबईस्थित विकास पुरी हे अमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे सूत्रधार आहेत. पोलिसांनी पुरीसह पाच जणांना अटक केली असून नितीन चिंचोले फरार आहे.
उमाळा शिवारात आणि औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 1175 किलो केटामाइन जप्त केले.
मास्टरमाइंड विकास पुरी : विकास पुरी याने औषधशास्त्र विषयात एम. टेक केले असून या क्षेत्रातला तो तज्ज्ञ मानला जात होता. त्याच्या व्हीसी फार्मा आणि स्पेशालिटी केमिकल या दोन कंपन्या रत्नागिरी येथे आहेत.