आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Crores Drugs Recover On Mumbai International Airport

मुंबईच्या आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर 12 कोटींचे ड्रग्ज जप्त; महिलेसह दोघे अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये कस्टम विभागाच्या अधिका-यांनी मुंबईच्या आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सुमारे 12 कोटींचे ड्रग्ज जप्त केले. ममदू मुबारक हा अफ्रिकन नागरिकाने आपल्या पोटात कोकीनच्या 76 कॅप्सुल्सचे सेवन केले होते. तो ब्राझिलहून दुबईमार्गे मुंबईत आला होता. कस्टम अधिका-याला मिळालेल्या खबरीनुसार त्याची एक्स-रे तपासणी केली असता त्याच्या पोटातील कॅप्सुल्समध्ये तब्बल 1 किलो कोकिन आढळून आले. या ड्रग्जची बाजारातील किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे.


दुस-या घटनेत, साझनी मेमोरी गामा या अफ्रिकन महिलेला साडेसात कोटींचे अंमली पदार्थाची तस्करी करत असताना पथकाने अटक केली. विमानतळावर ही महिला येताच कस्टम अधिका-यांनी तिच्या सामान्याची झाडझडती घेतली असता 15 किलो अंमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी गामाला अटक केली आहे.