आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Girl On Acid Attack In Last 10 Years At Mumbai

राजधानीत दहा वर्षांत 12 तरुणींवर अ‍ॅसिड हल्ले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईमध्ये मागच्या दहा वर्षांत 12 तरुणींवर अ‍ॅसिड हल्ले झाल्याची माहिती सनद माने या ‘आरटीआय’ कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारात मिळवली आहे.

1 मे रोजी वांद्रे रेल्वेस्थानकात अ‍ॅसिड हल्ला झालेल्या प्रीती राठी या दिल्लीच्या तरुणीचे नुकतेच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यामुळे मुंबईत तरुणींवर होणार्‍या अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

1998 पासून मुंबई शहरात 12 तरुणींवर अ‍ॅसिड हल्ले झाले आहेत. त्यामध्ये अमृता देशपांडे, अर्चना प्रभू, जिगना पटेल, हर्षला सातवे, प्रियंका डिसोझा, सलमा शेख, विद्या गायकवाड, भारती कदम, राणी शेख, जमुना बोहरा, आरती बोकर आणि नुकतीच मृत पावलेली प्रीती राठी या तरुणींचा समावेश आहे.
देशात अ‍ॅसिड विक्रीवर बंदी आणावी या मागणीसाठी ‘आरटीआय’ कार्यकर्ते सनद माने यांनी राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला. अ‍ॅसिड हल्ला झालेल्या तरुणींना खासगी नोकरी नाकारली जाते, त्यामुळे या तरुणींना शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी फाउंडेशनने केली आहे.

रेल्वे देणार 22 लाख
प्रीती राठीवर 1 मे रोजी अ‍ॅसिड हल्ला झाला होता. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एक महिन्यानंतर सोमवारी तिचे निधन झाले. तिच्यावरील उपचाराचा खर्च 22 लाख एवढा आहे. प्रीती रेल्वेने प्रवास करत असताना तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. त्यामुळे तिच्यावरील उपचाराचा खर्च पश्चिम रेल्वे देणार आहे.