आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 टोल बंद होणार, 53 टोलनाक्यावर छोट्या वाहनांना सूट; वाचा यादी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटची दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 12 टोलनाके 1 जूनपासून बंद होतील अशी घोषणा केली. याचबरोबर राज्यभरातील 53 टोलनाक्यावरून खासगी वाहनांना 1 जून 2015 पासून टोलमधून सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली. यात एसटी, रिक्षा, कार व जीप यासारख्या खासगी छोट्या चारचाकी गाड्यांना सूट मिळणार आहे. कोल्हापूर टोलनाक्याविषयी 31 मे पर्यंत सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यात सत्ता मिळाली तर सर्व टोल बंद करू अशी गर्जना भारतीय जनता पक्षाने केली होती. त्यानुसार युती सरकारने सध्या महाराष्ट्रातील 12 टोल नाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबत 53 टोलनाक्यावर खासगी चारचाकी वाहनांना (कार) टोलमाफी देण्यात येणार आहे. जे 53 टोल नाके बंद करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे त्यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे 26 टोल नाके आहेत, तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 27 टोलनाक्यांचा समावेश आहे.
जे 12 टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्या टोलची मुदत काही दिवसांमध्ये संपत आहे. कंत्राटदारांना या 12 टोलनाक्याचे उर्वरित पैसे ( सुमारे 450-500 कोटी रूपये) देऊन हे टोल राज्य सरकार ताब्यात घेणार आहे. यासाठी 500 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र बंद होऊ शकणारे टोल नाके कोणते याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
मुंबईतील 6 एंट्री पाईंटवरील टोलनाके, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील टोलनाक्याबाबत आढावा घेऊन मंत्रालयातील अप्पर सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालावर 31 जुलैपर्यंत निर्णय घेणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोल्हापूर टोलबाबतही जी समिती नेमली आहे त्यानुसार निर्णय घेण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.
पुढे वाचा, कोणते कोणते टोल होणार आहेत बंद...