आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रविवारी रात्रीपासून 12 टोलनाके बंद, कार, जीप, एसटी बसेसनाही 53 टोलनाक्यांवर सूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमधून कार, जीप व एसटी बसेसना सूट आणि १२ टोलनाके बंद करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी ३१ मेच्या मध्यरात्रीपासून होणार असून तसा आदेश निघाला आहे.
बांधकाम विभागाचे ११ व राज्य रस्ते विकास महामंडळाचा १ असे १२ टोलनाके बंद करण्यात येणार आहेत. शिवाय पीडब्ल्यूडीचे उर्वरित २७ व एमएसआरडीसीचे २६ अशा ५३ नाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसना सूट देण्याची घोषणा झाली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. या नाक्यांवर कार, जीप व एसटीसाठी स्वतंत्र दोन मार्गिका ठेवण्यात याव्यात. त्याचप्रमाणे या वाहनांना पथकरात सूट असल्याचे फलक लावावेत, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यातील या नाक्यांवर टोलमाफी
{ औरंगाबाद- जळगाव रस्ता : सावंगी
{ औरंगाबाद- पैठण रस्ता : नक्षत्रवाडी
{ औरंगाबाद- जालना रस्ता : लाडगाव, नागेवाडी
{ जालना- वाटूर रस्ता : पिंप्री फाटा
बातम्या आणखी आहेत...