आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारानंतर 12 वर्षांची मुलगी गर्भवती; गर्भपातासाठी तिच्या पालकांनी उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चारकोप भागात या मुलीवर बलात्कार झाला आहे. - Divya Marathi
चारकोप भागात या मुलीवर बलात्कार झाला आहे.
मुंबई- बलात्कारानंतर एक 12 वर्षांची मुलगी 6 महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून अनोळखी आरोपीविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, तिच्या पालकांनी गर्भपातासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
 
ही अल्पवयीन मुलगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती 27 आठवडय़ांची गर्भवती असल्याची बाब उघड झाली. या घटनेमुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला असून बुधवारी त्यांनी बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. फक्त 20 आठवडय़ांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असल्याने आतापर्यंत मुंबईतील 9 गर्भवतीनीं सर्वोच्च न्यायालयात गर्भपाताच्या परवानगीसाठी धाव घेतली आहे. यापैकी 7 महिलांनाच गर्भपाताची परवानगी देण्यात आली असून इतर 2 प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातास नकार दिला होता. 
बातम्या आणखी आहेत...