आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: अक्सा बीच विषारी दारूतील बळींची संख्या 37 वर; 25 जण चिंताजनक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मालाड भागातील अक्सा बीचवर पिकनिकसाठी गेलेल्या तरुणांच्या एका गटाने गुरुवारी विषारी दारूचे घेतल्याने 37 जणांचा मृत्यू झाला. तर अद्याप 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी राजू लंगडा याला अटक करण्यात आले आहे. गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ही माहिती दिली. घटनेचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.

पावसाचा आनंद घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी मालाडच्या अक्सा बीचवर गेलेल्या 60-70 जणांनी विषारी दारू घेतली. यातील काहींना अस्वस्थ वाटू लागले. स्थानिक विक्रेत्याकडून घेतलेली दारू विषारी निघाली. अस्वस्थ तरुणांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 37 जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. या वृत्ताला मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे. अस्वस्थ व्यक्तींवर शताब्दी, प्राईम, सिद्धार्थ रुग्णालयात उपचार सुरू होते.
पुढील स्लाइडवर वाचा, विषारी दारूची चाैकशी करा: मुख्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...