आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक शोषणातून अल्पवयीन मुलगी 6 महिन्यांची गरोदर; गर्भपातासाठी पालक सुप्रीम कोर्टात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चारकोप परिसरात राहाणारी 13 वर्षांची मुलगी 6 महिन्यांची गरोदर असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. बलात्कार, बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्यान्वये (पॉक्सो) पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

काय आहे हे प्रकरण?
- पीडित मुलगी चारकोप परिसरात राहाते.
- बुधवारी (9 ऑगस्ट ) रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती 27 आठवड्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
- या घटनेमुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
- त्यांनी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. अज्ञात आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

गर्भपातासाठी सुप्रीम कोर्टात घेतली धाव...
- पीडितेच्या गर्भपातासाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी तिच्या पालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
- दरम्यान, भारतात 20 आठवडय़ांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी सुप्रीम कोर्ट देते.

सात पीडितांना गर्भपाताची परवानगी
- आतापर्यंत मुंबईतील 9 गरोदर पीडितांनी सुप्रीम कोर्टात गर्भपाताच्या परवानगीसाठी धाव घेतली होती.
- 9 पैकी 7 पीडितांना गर्भपाताची परवानगी देण्यात आली असून इतर 2 प्रकरणात कोर्टाने गर्भपातास स्पष्ट नकार दिला होता.
बातम्या आणखी आहेत...