आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरऊर्जेतून १४ हजार मेगावॅट वीजनिर्मिती शक्य, मुख्यमंत्र्यांसमोर आज धोरणाचे प्रात्यक्षिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यावर सध्या विजेचे मोठे संकट नसले, तरी भविष्यात तशी परिस्थिती येऊ नये, यासाठी सौरऊर्जेवर भर देण्याचा िनर्णय युती सरकारने घेतला आहे. यासाठी अपारंपरिक सौरऊर्जेतून १४,४०० मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठीच सौरऊर्जा धोरणाचे प्रात्यक्षिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केले जाणार असल्याची माहिती ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे.

सौर, वारा, लघु जलविद्युत, उसाचे चिपाड, कारखान्यांमधील औद्योगिक घनकचरा, कृषी कचरा या अपारंपरिक माध्यमातून सौरऊर्जेची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी राज्य ऊर्जा विभाग मंडळ तसेच अपारंपरिक ऊर्जा िवभागाच्या वतीने सौरऊर्जा धोरणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. १५००० मेगावॅटपैकी ७५०० मेगावॅट वीज ही सौरऊर्जेमधून आणि वा-यापासून ४५०० मेगावॅटची वीज तयार केली जाईल, तर उर्वरित वीज ही सौरऊर्जेच्या इतर माध्यमांतून तयार केली जाईल. यासंबंधीचे प्रात्यक्षिक झाल्यानंतर मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वरिष्ठ अधिकारी यावर चर्चा करून काही सूचना करणार आहेत.

राज्यासमोर सध्या विजेचा फार मोठा तुटवडा जाणवत नाही. फक्त दुपारच्या वेळेस ५०० मेगावॅट कमी पडत आहे. मात्र, रात्री तब्बल २ हजार मेगावॅट वीज िशल्लक राहते. मात्र, वाढती लोकसंख्या व विजेची वाढती गरज लक्षात घेऊन सौरऊर्जेवर भर देण्याचा सरकारने िनर्णय घेतला आहे. हे धाेरण अंितम टप्प्यात आले असून त्यावर गुरुवारच्या प्रात्यक्षिकावेळी सूचना करून त्याला अंितम प्रारूप देण्यात येईल.

सौरऊर्जा धोरणाचा १४ पानांचा मसुदा असून त्यात सर्वाधिक भर अर्थातच सौर माध्यमातून तयार होणा-या ऊर्जेवर असेल. गुजरातमध्ये या माध्यमातून मोठी वीज तयार करण्यात आली आहे. त्याचाही अभ्यास करण्यात आला असून कच्छच्या वाळवंटात सौरऊर्जा निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या संचांच्या अभ्यासातील माहितीचाही प्रात्यक्षिकात समावेश करण्यात आला आहे. शिवाय उत्तरेकडील राज्यांनी पाण्यावर तयार केलेल्या विजेवर लक्ष केंिद्रत करून त्यामधील काही महत्त्वाच्या बाबींचाही यात उल्लेख आहे. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा िवचार करून आणि या सर्व माहितीचा अभ्यास करून सौरऊर्जेचे धोरण तयार करण्यावर राज्य सरकारचा भर असणार आहे, असे संबंधित अधिका-यांनी सांिगतले.

सौरऊर्जा पर्यावरणाला साजेशी, पण िकंमत भारी!
कोळसा, जल तसेच अणुऊर्जेला बंधने असल्याचे िदसून आल्याने जगभरात आता अपारंपरिक ऊर्जेेवर भर िदला जात आहे. जागतिक तापमान वाढीच्या इशा-याने संपूर्ण युरोप खंडात सध्या कोळसा तसेच अणुऊर्जेच्या िवरोधात लढे उभारले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सौरऊर्जेचा पर्याय पुढे येत आहे. मात्र, या ऊर्जेवर झालेल्या संशोधनातून युरोप खंडात भारताच्या तुलनेत ही वीज स्वस्त असल्याचे िदसून येते. सौरऊर्जा धोरण तयार करताना या मुद्द्यावर अधिक भर िदला जाणार आहे.