आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 141 Couples Married At Collective Common Wedding Ceremony

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सामुहिक विवाह सोहळ्यात देशभरातील 141 जोडपी अडकली बंधनात, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवी मुंबईतील खारघर येथे सिडको मैदानावर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात 141 जोडप्यांनी आयुष्याच्या नवीन वाटचालीला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या 48व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. त्यांच्या पत्नी माता सविंदरजीही याही यावेळी उपस्थित होत्या. महाराष्ट्राच्या विभिन्न भागांसह गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, हरियाणा, आंध्र प्रदेश, केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील दांपत्यांचा यात समावेश होता.
साध्या पद्धतीने विवाह करण्याच्या या पद्धतीचा स्वीकार केल्याच्या निर्णयाबाबत बाबाजींनी नवदांपत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे व मित्रमंडळींचेही अभिनंदन केले. माता सविंदरजी यांनी नवदांपत्यांना आशीर्वाद रुपाने रोख रकमेच्या रुपात भेट दिली, तसेच सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पुढील स्लाइडवर पाहा, या विवाह सोहळयाचे PHOTO