Home | Maharashtra | Mumbai | 15 Bird Caste Collapse in India

भारतातील 15 पक्ष्यांच्या दुर्मिळ जाती नामशेष होण्याच्या मार्गावर

प्रतिनिधी | Update - Nov 28, 2013, 01:30 AM IST

भारतात विविध पातळ्यांवरील पक्षी संवर्धनाच्या प्रयत्नांना यश येत असूनही पक्ष्यांच्या 15 जाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या आंतरराष्‍ट्रीय संस्थेने जारी केलेल्या धोक्यातील पक्ष्यांच्या यादीत याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर यादीतील तीन जातींचा धोका गतवर्षापेक्षा वाढून त्या लुप्त होण्याच्या

 • 15 Bird Caste Collapse in India
  मुंबई- भारतात विविध पातळ्यांवरील पक्षी संवर्धनाच्या प्रयत्नांना यश येत असूनही पक्ष्यांच्या 15 जाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या आंतरराष्‍ट्रीय संस्थेने जारी केलेल्या धोक्यातील पक्ष्यांच्या यादीत याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर यादीतील तीन जातींचा धोका गतवर्षापेक्षा वाढून त्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.

  भारतात याबाबतची माहिती व संशोधन करण्यात बीएनएचएस-इंडियासारख्या संस्था मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांना इंग्लंडमधील बर्डलाइफ इंटरनॅशनल या संस्थेची साथ मिळत आहे. मध्य भारतातील पानगळीची वने उजाड केली जात असल्यामुळे रानपिंगळ्यांची संख्या कमी झाली आहे. पश्चिम घाटांवरील जंगले व हिमालयातील बेसुमार वृक्षतोडीमुळे आधीच दुर्मिळ असलेले पक्षी नामशेष होत आहेत. याशिवाय अनेक डायक्लोफेनॅकसारख्या रासायनिक तत्त्वांमुळे गिधाडांच्या प्रजाती अत्यंत धोक्यात आल्या आहेत.

  बीएनएचएस इंडियाचे संचालक डॉ. असद रेहमानी यांनी सांगितले की, आजघडीस शास्त्रशुद्ध वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करून पक्षी व त्यांच्या अधिवासाचे जतन करण्याची अत्यंत गरज आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. शाश्वत विकासाच्या धोरणांची पुनर्आखणी करून त्यांची अंमलबजावणी केली जावी.

  या पक्ष्यांचा समावेश : धोक्यातील 15 पक्षी
  1. लालसरी बदक
  2. तणमोर
  3. वनपिंगळा
  4. माळढोक
  5. हिमालयीन तितर
  6. भारतीय गिधाड
  7. जॉर्डन धाविक
  8. गुलाबी डोक्याचे बदक
  9. लाल डोक्याचे गिधाड
  9. सारस पक्षी क्रौंच
  10. लांब चोचीचे गिधाड
  11.माळटिटवी
  12.चमचातुतारी
  13.पांढर्‍या पाठीचे गिधाड
  14.काळ्या पोटाचा सुरय
  15. पांढरा सारंग
  अधिवासावर ताण :
  मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विकासाकामांमुळे पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे आकारमान प्रचंड प्रमाणात घटत चालले असल्याचे बीएनएचएस आणि इतर पक्षी संस्थांच्या संशोधनात निदर्शनास आले आहे. गेल्या दहा वर्षांत गवताळ प्रदेशातील अधिवास मोठ्या प्रमाणात घटल्याने भारतीय माळढोक, बेंगॉल फ्लोरिकन आणि जॉर्डन धाविक हे पक्षी लुप्ततेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

Trending