आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 IAS Officers Transferred In Maharashtra News In Marathi

राज्यातील 15 प्रशासकिय अधिकार्‍यांच्या बदल्या, सोलापुरच्या आयुक्तांची पुन्हा बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील 15 प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आज (शुक्रवारी) तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. महिनाभरात हा तिसरा बदल आहे. सोलापूर महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची पुन्हा एकदा तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. गुडेवार यांच्या बदलीला हायकोर्टाची स्थगिती होती. मात्र, तरीही गुडेवार यांची बदली करण्यात आल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

चंद्रकात गुडेवार यांची ग्रामविकास खात्यामध्ये बदली झाली आहे. त्यांच्या जागी म्हणजे सोलापूरच्या आयुक्तपदी शेखर गायकवाड असतील. तसेच नाशिकला होणारा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐन तोंडावर जिल्हाधिकारी विलास पाटील यांची बदली करण्‍यात आली आहे. विलास पाटील यांची मुंबई फिल्मसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली. नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


या‍शिवाय अरविंद कुमार यांची मुंबई एमआयडीसीच्या आयुक्तपदी, महाराष्‍ट्र डेव्हलपमेंड बोर्डाचे सचिव पी.के.व्यास यांची राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी, सीमा व्यास यांची हाफकिन, बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे मुख्य संचालक पी.एन. भापकर यांची शिक्षण आयुक्तपदी (पुणे), मानवाधिकार आयोगाचे सचिव एस.पी.कडू पाटील यांची आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (पुणे), ठाणे जिल्हापरिषदेचे सीईओ एस.एन.गायकवाड यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी, उदय चौधरी यांची गायकवाड यांच्या जागी नियुक्ती करण्‍यात आली आहे. जव्हार येथील उपायुक्त सुशील खोडवेकर यांची नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदी, गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल रेखावार यांची हिंगोली जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, डी.एम. मुगलीकर यांची विक्रीकर कार्यालय, औरंगाबाद येथे सहआयुक्तपदी, डी.बी.गावडे यांची गोंदिया जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, अभय यावलकर यांची विक्रीकर कार्यालय, मुंबई येथे सहआयुक्तपदी तर मिलिंद गावडे यांची अकोला महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्‍यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या सनदी अधिकार्‍यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दणका दिला होता. गेल्या जानेवारी महिन्यात एकाच दिवशी तब्बल 42 अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या होत्या.