आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतनीकरणासाठी पंधरा मंत्र्यांनी खर्च केले २ कोटी, रवींद्र वायकर, चंद्रकांत पाटील आघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवे राज्य आले की मंत्री आपली जुनी कार्यालये चकाचक करण्यावर भर देतात. तिजोरीत रक्कम असो वा नसो या मंत्र्यांना आपली कार्यालये आलिशान लागतात. "दिव्य मराठी'ने याबाबतची माहिती काही महिन्यांपूर्वीच दिली होती. माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १५ मंत्र्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणावर राज्य सरकारने दोन कोटी रुपये खर्च केले असून खर्च करण्यात गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत.

२८ मंत्र्यांपैकी नऊ मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांनी कार्यालयाच्या नूतनीकरणावर दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये एक कोटी ७४ लाख ७४ हजार ४०१ रुपये स्थापत्य आणि २५ लाख १६ हजार ४३८ रुपये विद्युत कामावर खर्च केले आहेत. खर्च करण्यामध्ये रवींद्र वायकर आघाडीवर असून त्यांनी ३३ लाख ९९ हजार १७० रुपये कार्यालय नूतनीकरणावर खर्च केले आहेत. चंद्रकांत पाटील यांचा खर्च करण्यात दुसरा क्रमांक लागला असून त्यांनी ३१ लाख ८८ हजार ६७ रुपये १२ पैसे खर्च केले आहेत. आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांनी २० लाख ४८ हजार २७१ रुपये ८० पैसे, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी २० लाख २४ हजार ७५५ रुपये, रणजित पाटील १५ लाख ५३ हजार ४५० रुपये, तर इतर मंत्र्यांनी असाच खर्च केला आहे.