आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डोंट ड्रिंक आणि ड्राइव्ह’अभियान: दारू पिऊन गाडी चालवणा-यांच्या संख्येत 15 % घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या ‘डोंट ड्रिंक आणि ड्राइव्ह’ अभियानाची धास्ती अनेक मुंबईकरांनी घेतली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दारू पिऊन गाडी चालवणा-यांच्या प्रमाणात 15 टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे.


दारू पिऊन गाडी चालवणा-यांच्या विरोधात गेल्या दोन वर्षांपासून मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. मद्यपान करून कोणी गाडी चालवताना जर कोणी पोलिसांच्या हाती लागला तर संबंधित व्यक्तीचे लायसन्स आणि तुरुंगवासाची शिक्षा पोलिसांकडून केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी कारवाईच्या धास्तीने दारू पिऊन गाडी चालवणे बंद केले आहे. 2012 मध्ये वाहतूक पोलिसांनी 14 हजार 220 जणांवर कारवाई केली, तर 2011 मध्ये हाच आकडा 16 हजार 324 एवढा होता. तसेच पोलिसांनी गेल्या वर्षी दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे 4 हजार 187 जणांचे लायसन्स रद्द केले. 2011 मध्ये हा आकडा 6 हजार 37 एवढा होता. 2012 मध्ये 5 हजार 260 जणांना दारू पिऊन गाडी चालवल्याने तुरुंगवासाची शिक्षा झाली, तर 2011 मध्ये 6 हजार 94 जणांना तुरुंगाची हवा खावी लागली. एकूणच पोलिसांच्या बडग्यामुळे मद्यपान करून गाडी चालवणा-यांच्या संख्येत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. अनेक अपघात दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात. वाहतूक पोलिसांनी त्याविरोधात मोहीम उघडण्याची आवश्यकता असल्याचे मत वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले.


अनेकांना शिक्षेची भिती
लायसन्स रद्द आणि तुरुंगवासाच्या भीतीने अनेकांनी दारू पिऊन गाडी चालवणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 15 टक्क्यांनी खाली आला आहे.’’
विवेक फनसलकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त