आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Thousand Employee Of Revenue Dept. On Strike From Today

नायब तहसीलदार, तलाठ्यांसह 'महसूल'चे 15 हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गेल्या 32 वर्षात राज्यातल्या तलाठी सज्जाची पुर्नरचना केलेली नाही. याबाबत महसुलमंत्र्यांनी 30 एप्रिलपर्यत सज्जे वाढवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र ते पुर्ण न झाल्यामुळे राज्यातले 12 हजार 637 तलाठी 2106 मंडळ अधिकारी आणि 400 नायब तहसीलदार आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
सातबारा संगणकीकरण, इ-फेरफारसंदर्भात येणा-या अडचणींबाबत जमाबंदी आयुक्तांना वेळोवेळी कल्पना दिली आहे. सॉफ्टवेअरमध्येही अनेक चुका आहेत. मात्र, याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असून, त्रुटी दूर केल्या जात नसल्याने अखेर हतबल झालेल्या महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडल अधिकारी समन्वय महासंघाने आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुरकारल्याने आजपासून सातबारा उताराही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाकडून मागण्यांची पूर्तता केली जात नसून, कामाचा मात्र अतिरिक्त ताण वाढविला जात आहे. राज्यात 3 हजार 84 तलाठी नवीन तलाठी सज्जे आणि 514 मंडळ अधिकारी पदे निर्माण करण्यात टाळाटाळ केली जात आहे. यासाठी शासन दरबारी वारंवार दाद मागण्यात आली. परंतु शासनाकडून दुर्लक्ष झाले असून, महसूलमंत्र्यांनी मागण्या पूर्तीचे आश्वासन देऊन वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी झाली. याचा निषेध म्हणून संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 11 एप्रिलला काळया फिती लावून आंदोलन केले होते. 16 एप्रिलला तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली होती.
काय आहेत महसूल विभाग कर्मचा-यांच्या प्रमुख मागण्या...
- तलाठी सजांची महसूल मंडलाची पुनर्रचना करावी.
- तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजाचे योग्य प्रशिक्षण द्यावे.
- अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठी संवर्गास वगळण्यात यावे.
- तलाठी मंडल अधिकारी कार्यालय बांधून देण्यात यावे.
- 25 टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवावी.
- अंशदायी निवृत्ती वेतन योजना रद्द करावी.
- महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करावा.