आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 150 Yrs Of Bombay Hc: Special Postal Cover, Stamps Released

मुंबई हायकोर्टावर विशेष पोस्टल कव्हर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उच्च न्यायालयाच्या स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत विशेष पोस्टल कव्हरचे मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. या वेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये करण्यात आली. त्याच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने उच्च न्यायालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विशेष कव्हरसह पोस्ट तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, उच्च न्यायालयाशी संबंधित विविध ऐतिहासिक दस्तऐवज आणि मौलिक वस्तूंचे प्रदर्शनही भरवण्यात आले आहे. ते 18 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. या सोहळ्याची सांगता नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथे शनिवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.