आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य निवडणूक आयोगाने रिपाइंसह स्वाभिमानी, शेकापची मान्यता रद्द केली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई; राज्य निवडणूक आयोगाने रामदास आठवले यांच्या रिपाइंसह १६ राज्यस्तरीय राजकीय पक्षांची मान्यता मंगळवारी रद्द केली. २००५ ते २०१४ या काळातील प्राप्तिकर परतावे आणि लेखा परीक्षण झालेली खाती सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
वारंवार स्मरणपत्रे देऊनही या १६ राजकीय पक्षांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटले आहे. मान्यता रद्द करण्यात आलेल्या राजकीय पक्षांमध्ये खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, आमदार कपिल पाटलांचा लोकभारती, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपाइं (डेमोक्रॅटिक)चा समावेश आहे.
१ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर आणि कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका
होत असून त्याच्या तोंडावरच निवडणूक आयोगाने मान्यता रद्द केल्यामुळे या पक्षांच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळणार नाही आणि नावापुढे पक्षाचे नावही येणार नाही.